घरदेश दुनियाअफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २५५ लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २५५ लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील अनेक भागांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भूकंपात तब्बल २५५ लोकांचा मृत्यू झाला आहे तर १५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांकडून बचाव कार्य राबवण्यात येत आहे. या भूकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की अफगाणिस्तान सोबतच पाकिस्तान आणि भारतातील काही भागांनाही हा धक्का जाणवल्याची माहिती आहे.

अफगाणिस्तानमध्ये ६.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का जाणवला. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. दक्षिणपूर्व अफगाणिस्तानच्या खोत शहरापासून ४४ किलोमीटर दूर या भूकंपाचा केंद्रबिदू असल्याची माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. या भूकंपाचा प्रभाव ५०० किमीच्या परिघात होता त्यामुळे अफगाणिस्तानसोबत पाकिस्तान आणि भारतालाही भूकंपाचे धक्के जाणवले.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंची रामराज्याची प्रार्थना फळली!

संजय राऊत यांनी सांगितले, सरकारचा कारभार आटोपला

‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’

राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानमधील पेशावर, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि मुलतान शहरांनाही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तानमधील बर्मल, झिरुक, नाका आणि ग्यान जिल्ह्यांना भुकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भागातील मृतांची संख्या २५५ वर पोहचली असून १५५ पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असून मातीच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version