अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र होत असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. तसेच इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळत असून, तेहरान आता अपरिहार्य परिस्थितीचा सामना करत असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणवरील अमेरिकेच्या ताज्या हवाई हल्ल्यांनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर ही प्रतिक्रिया दिली. अमेरिका इराणला पुन्हा चर्चेच्या टेबलावर आणण्याचा प्रयत्न करत असल्याच्या वृत्ताचेही त्यांनी खंडन केले.
“इराणला वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यासाठी मी प्रयत्न करत नाही. त्यांनी एखाद्या करारावर स्वाक्षरी केली नाही तरी मला त्याची पर्वा नाही,” असे ट्रम्प यांनी म्हटले. सध्या होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण असून, इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळत असल्याचा दावाही त्यांनी केला. ट्रम्प यांनी इराणमधील जनतेलाही थेट आवाहन केले. “इराणचे लोक सरकारविरोधात उठून लढण्यासाठी कधी पुढे येणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
अमेरिकेकडून इराणमधील लग्नघरावर क्षेपणास्त्र हल्ला
धावत्या ट्रेनमध्ये दिवा लावून देवाची पूजा
भावनगरच्या रेल्वेला मिळणार ‘बूस्टर’!
पुराच्या पाण्यातून वाहून आलेले मासे खाल्यांने बिहारमधील अनेक लोक आजारी
फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षादरम्यान ट्रम्प यांनी अनेकदा होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. मात्र, इराणने अमेरिकेचा हा दावा सातत्याने फेटाळला असून, ही महत्त्वाची सामुद्रधुनी अजूनही इराणच्या नियंत्रणाखाली असल्याचे तेहरानचे म्हणणे आहे. दरम्यान, अमेरिकेने मंगळवारी इराणमधील विविध लक्ष्यांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर इराणने जॉर्डन, बहरीन आणि इराकमधील अमेरिकन लष्करी तळ आणि हितसंबंधांवर हल्ले करून प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त आहे.
