घरदेश दुनियाअमेरिकेकडून इराणमधील लग्नघरावर क्षेपणास्त्र हल्ला

अमेरिकेकडून इराणमधील लग्नघरावर क्षेपणास्त्र हल्ला

चार जणांचा मृत्यू

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेने इराणमधील विविध ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. दक्षिण इराणमधील एका घरावर झालेल्या हल्ल्यात लग्न समारंभ सुरू असताना किमान चार जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या घटनेनंतर इराणने अमेरिकेला कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकेला उद्देशून इराणच्या सशस्त्र दलांकडे वॉशिंग्टनसाठी “कधीही विसरता येणार नाहीत असे धडे” असल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या नव्या हल्ल्यांनंतर खामेनेई यांचे हे पहिले सार्वजनिक वक्तव्य आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यावसायिक जहाजांवर आणि या भागातील अमेरिकन सैनिकांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या प्रत्युत्तरात इराणमधील लक्ष्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, इराणी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दक्षिण इराणमधील सिरिक परिसरातील कुहेस्तक येथे एका घरात लग्न समारंभ सुरू असताना अमेरिकन हल्ल्यातील क्षेपणास्त्राचे तुकडे घरावर कोसळले. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ५० जण जखमी झाले.

दरम्यान, अमेरिकेने नागरिकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. अमेरिकन सैन्याने नागरिकांवर हल्ला केला नसल्याचे CENTCOMच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. इराणने बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकन हितसंबंध आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

हे ही वाचा:

धावत्या ट्रेनमध्ये दिवा लावून देवाची पूजा

भावनगरच्या रेल्वेला मिळणार ‘बूस्टर’!

पुराच्या पाण्यातून वाहून आलेले मासे खाल्यांने बिहारमधील अनेक लोक आजारी

ओरॅकलमध्ये १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) प्रवक्त्यांनी अमेरिकेला नव्या हल्ल्यांची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. “आक्रमकांना कठोर शिक्षा मिळेल,” असेही त्यांनी म्हटले आहे. जॉर्डनमध्ये अमेरिकन लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र, जॉर्डनच्या सैन्याने इराणकडून डागण्यात आलेली अनेक क्षेपणास्त्रे हवेतच रोखल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version