घरदेश दुनियाइस्रायलमध्ये होणार यूपीआयमधून व्यवहार!

इस्रायलमध्ये होणार यूपीआयमधून व्यवहार!

पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात नेतान्याहू यांना त्यांचे मित्र म्हणून केली आणि म्हणाले, “आमचे संबंध काळाच्या कसोटीवर उतरले असून या भागीदारीला विशेष धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लवकरच एक मुक्त व्यापार करार अंतिम करणार आहोत.” इस्रायलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी शिष्टमंडळ स्तरावरील द्विपक्षीय चर्चा केली. संरक्षण, सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान आणि कृषी यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यावर चर्चा झाली. त्यानंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेतान्याहू यांच्या उपस्थितीत करारांची देवाणघेवाण झाली. विशेष म्हणजे भारताचा यूपीआय आता इस्रायलमध्ये उपलब्ध असणार आहे.

या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नेतन्याहू यांना त्यांचे मित्र म्हणून संबोधून केली आणि त्यांच्या स्वागताबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “नऊ वर्षांपूर्वी, मला भारताचे पंतप्रधान म्हणून इस्रायलला भेट देण्याची संधी मिळाली. आता, माझी दुसरी भेट हा खूप भावनिक क्षण आहे. काल, मला संसदेला संबोधित करण्याची संधी मिळाली आणि मला नेसेट पदकानेही सन्मानित करण्यात आले. मी याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि ते १.४ अब्ज भारतीयांना आणि भारत-इस्रायल मैत्रीला समर्पित करतो.”

“आमचे संबंध काळाच्या कसोटीवर उतरले आहेत. आता आम्ही आमच्या भागीदारीला विशेष धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लवकरच मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देऊ. तंत्रज्ञान आमच्या भविष्यातील भागीदारीचा केंद्रबिंदू आहे. आज आम्ही एक महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान भागीदारी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एआय, क्वांटम आणि महत्त्वपूर्ण खनिजे यासारख्या क्षेत्रात सहकार्याला चालना मिळेल” महत्त्वाचे म्हणजे त्यांनी असेही सांगितले की, भारताचा यूपीआय आता इस्रायलमध्ये उपलब्ध असेल.

भारत- इस्रायल शैक्षणिक मंच स्थापन करत आहोत. आम्ही IMAC कॉरिडॉर आणि I2U2 वर नवीन गतीने पुढे जाऊ. आम्ही दोघेही सहमत आहोत की जगात दहशतवादाला स्थान नाही. ते कोणत्याही स्वरूपात सहन केले जाऊ शकत नाही. आम्ही दहशतवादाविरुद्ध खांद्याला खांदा लावून उभे आहोत आणि ते करत राहू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

हे ही वाचा:

मोलकरणीने स्पेशल २६ प्रमाणे मालकाच्या घरावर टाकला छापा

‘द केरळ स्टोरी २’ च्या प्रदर्शनाला स्थगिती! कारण काय?

इंस्टाग्रामवर मोदी जगात नंबर वन, १० कोटी फॉलोअर्स

येस बँकवर आरबीआयची करडी नजर

तत्पूर्वी, पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की भारत आणि इस्रायल एकत्र खूप काही करू शकतात. आमच्या वैयक्तिक मैत्रीबद्दल आणि आमच्या देशांमधील मैत्रीबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. नेतन्याहू म्हणाले की आम्ही शेती, शिक्षण आणि एआयसह सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. आम्हाला विश्वास आहे की आमचे संबंध अधिक मजबूत होतील. त्यांनी इस्रायलमध्ये यूपीआय सुरू करण्याची घोषणाही केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version