घरदेश दुनियारशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा अभिनेता पाशा ली ठार

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा अभिनेता पाशा ली ठार

इंस्टाग्रामवरील त्याची शेवटची पोस्ट व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धात हजारो नागरिकांचा आणि युक्रेनियन सैनिकांना जीव गमावला आहे. युक्रेनचे नागरिकही या लढ्यात उतरले आहेत. युक्रेनमध्ये सर्वसामान्यांपासून ते अभिनेत्यांनी युद्धासाठी शस्त्रे हाती घेतली आहेत. रशियन आक्रमणापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र दलात सामील झालेला युक्रेनियन अभिनेता पाशा ली हा इरपिन येथे गोळीबारात ठार झाला. त्याने मृत्यूपूर्वी इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवर केलेल्या त्या पोस्टमध्ये तो हसतमुख दिसत आहे. त्याने त्याच्या कॅप्शन मध्ये म्हटले की, “गेल्या ४८ तासांत खाली बसण्याची आणि आमच्यावर कसा बॉम्बफेक होत आहे याचा फोटो घेण्याची संधी आम्हला मिळाली आहे.आणि आम्ही आनंदी आहोत कारण ही स्थिती आम्ही नीट हाताळू शकत आहे.”

प्रसिद्ध अभिनेता पाशा ली हा याचे वय ३३ वर्ष होते. युद्ध सुरु झाल्यानंतर या अभिनेत्याने करिअर सोडून देशासाठी बंदूक हातात घेतली होती. युक्रेनच्या टेरिटोरियल डिफेन्स युनिटमध्ये तो सहभागी झाला होता. पाशा ली हा युक्रेनमधील प्रसिद्ध अभिनेता,डबिंग आर्टिस्ट, गायक आणि संगीत संयोजक होता. त्याने टीव्हीच्या जाहिरातीतुन करिअरला सुरवात केली होती. त्यानंतर मग त्याने सिनेमासृष्टीत पदार्पण केले होते .

हे ही वाचा:

उत्पल पर्रीकर पराभूत

गोव्यात भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचाली; १४ मार्चला शपथविधी?

शिवसेनेच्या हाती फक्त फिश करी राईस!

काँग्रेसचे पुन्हा पानिपत! राहुल पाठोपाठ प्रियांकाही नापास

दरम्यान, युक्रेनमधील सुमी येथे रशियाने केलेल्या बॉम्बस्फोटात २ मुलांसह १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी, ओख्तिरका येथील शाळेवर बॉम्ब टाकून ७ वर्षीय युक्रेनियन मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीच्या आजोबांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version