घरदेश दुनियाइराणच्या पाच तेलवाहू जहाजांवर अमेरिकेचा हल्ला

इराणच्या पाच तेलवाहू जहाजांवर अमेरिकेचा हल्ला

युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा

अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा पेटला असून तणाव निर्माण झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) गेल्या दोन दिवसांत अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेवर दोन वेळा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने इराणच्या पाच कच्च्या तेलवाहू जहाजांवर कारवाई करून ती नष्ट केल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) दिली.

सेंटकॉमच्या माहितीनुसार, अमेरिकन युद्धनौकेने इराणकडून करण्यात आलेले दोन्ही क्षेपणास्त्र हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले किंवा चुकवले. या हल्ल्यांमध्ये कोणत्याही अमेरिकन जवानाला दुखापत झालेली नाही. अमेरिकेने ज्या जहाजांवर हल्ला केला, त्यामध्ये एम/टी कविझ, एम/टी चारमिनार, एम/टी होरायझन-1 आणि एम/टी रिस्को या चार तेलवाहू जहाजांचा ओमानच्या आखातात समावेश होता. तर एम/टी देर्या या आणखी एका तेलवाहू जहाजावर इराणच्या खार्ग बेटाजवळ हल्ला करण्यात आला.

अमेरिकन सैन्याने हल्ल्यापूर्वी या जहाजांवरील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे जहाज सोडण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला आहे. त्यानंतर या जहाजांवर कारवाई करून ती वापरण्यायोग्य राहणार नाहीत, याची खात्री करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, ही तेलवाहू जहाजे इराणच्या एका मोठ्या गुप्त सागरी वाहतूक जाळ्याचा भाग होती. या जाळ्याच्या माध्यमातून आयआरजीसी आणि त्यांच्याशी संबंधित प्रादेशिक गटांना आर्थिक मदत पुरवली जात असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

रोहन पारीखला दिले होते पंतप्रधानांच्या खोट्या सहीचे ओळखपत्र

गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ

आयफोन १८ प्रोची उद्या ग्रँण्ड एन्ट्री

विशेष म्हणजे, यापूर्वी ५ सप्टेंबरलाही अमेरिकेने इराणची तीन तेलवाहू जहाजे नष्ट केल्याचा दावा केला होता. त्यावेळी आयआरजीसीने अमेरिकन विमानवाहू युद्धनौका आणि क्षेपणास्त्रवाहू विनाशिकेवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सेंटकॉमने म्हटले होते.

दरम्यान, इराणी माध्यमांनी अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. जहाजांवरील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या कारवाईनंतर इराणने कुवेत आणि बहारीनमधील तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version