घरराजकारणअभिजित दिपके जंतर-मंतरवर, कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन

अभिजित दिपके जंतर-मंतरवर, कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

- Advertisement -

सोशल मीडियावर खळबळ उडवणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून दिल्लीत आंदोलन केले जात आहे. पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर जंतर-मंतर येथे मोठ्या संख्येने तरुणांनी आंदोलनासाठी गर्दी केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेहून दिल्लीत दाखल झाले आहेत.

नीट पेपर लीक आणि देशातील नामांकित परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात राजधानीत विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात देशभरातून आलेले हजारो तरुण आणि विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली आहे.

शनिवारी सकाळी ७:४५ वाजता अमेरिकेतून दिल्लीत दाखल झालेले ‘CJP’ संस्थापक अभिजीत दिपके हे तब्बल दीड तास विमानतळाच्या आत होते. अखेर सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून जेव्हा ते विमानतळाबाहेर आले, तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक हातात उंचावून दाखवले. हातात देशाचा तिरंगा आणि आंबेडकरांचे पुस्तक घेऊन ते थेट जंतर-मंतर आंदोलनाकडे रवाना झाले. जंतर-मंतर मैदानाकडे जात असताना अभिजीत दिपके यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘इन्स्टाग्राम लाईव्ह’ करत समर्थकांशी संवाद साधला. ते म्हणाले, “हे आपल्या पक्षाचे पहिलेच मोठे आणि जाहीर आंदोलन आहे. त्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये. सर्वांनी शांततेच्या मार्गानेच आंदोलन करावे. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आदर करा आणि त्यांच्या सेवेसाठी त्यांना फुले भेट द्या.”

पक्षाने आंदोलकांसाठी जारी केलेल्या ८ कलमी नियमावलीनुसार, हजारो तरुण आज हातात तिरंगा, पुस्तक, फुले घेऊन आणि सनस्क्रीन लावून आंदोलनात सहभागी झाले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीवर आंदोलक घोषणा देत आहेत.

हे ही वाचा:

‘मेड इन पाकिस्तान’ लिहिलेली चादर पुण्यातील जत्रेत कशी पोहोचली?

नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा आर. प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय

तेहरानने होर्मुझच्या दिशेने ड्रोन डागल्यानंतर अमेरिकेचे इराणच्या रडार केंद्रांवर हल्ले

भारताच्या सामरिक स्वायत्ततेला पुतिन यांचा पाठिंबा

अभिजीत दिपके हे एक ‘पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट’ आहेत. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पुण्यातून पत्रकारितेत पूर्ण केले आहे. सध्या ते अमेरिकेतील ‘बॉस्टन युनिव्हर्सिटी’मधून पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्स करत आहेत. २०२० ते २०२३ या काळात त्यांनी ‘आम आदमी पार्टी’च्या सोशल मीडिया टीमसोबत काम केले होते. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या डिजिटल आणि मीम-बेस्ड प्रचाराची धुरा सांभाळण्यात त्यांची मोठी भूमिका होती. १५ मे २०२३ रोजी भारताच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांनी १६ मे रोजी सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ स्थापन केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version