घरराजकारणभाजपची नवी मोर्चेबांधणी; महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी

भाजपची नवी मोर्चेबांधणी; महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी

राज्यात बैजयंत पांडा प्रभारी, अमित मालवीयंसह तिघांकडे सहप्रभारीपद

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाने देशभरातील संघटनात्मक फेरबदल करत २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नव्या यादीत महाराष्ट्राची जबाबदारी बैजयंत जय पांडा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर सहप्रभारी पदाची जबाबदारी अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सेहरावत यांना देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

अमित मालवीय हे भाजपच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचारातील कामासाठी ओळखले जाणारे नेते आहेत. त्यांच्या महाराष्ट्रातील नव्या जबाबदारीमुळे पक्षाच्या संघटनात्मक कामासोबतच डिजिटल आणि माध्यमांशी संबंधित समन्वयालाही महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. तर, सदानंद शेट तानावडे हे गोवा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असून, कमलजीत सेहरावत या भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्या आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे यांच्यासोबत महाराष्ट्रातील दोन महिला नेत्यांवर भाजपनं मोठी जबाबदारी सोपवली आहे. दिंडोरीच्या माजी खासदार असलेल्या भारती पवार यांच्याकडे गोवा राज्याचा प्रभार देण्यात आला आहे. तर राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विनोद तावडे आणि मेधा कुलकर्णी यांच्याकडे पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. २०१७ पासून राज्यात भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात राज्यात भाजपचे सरकार आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून उत्तर प्रदेशातील निवडणुकीकडे पाहिले जात असताना तावडे आणि कुलकर्णी यांच्याकडे असलेली जबाबदारी महत्त्वाची आहे.

हे ही वाचा:

दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करणार

सिंधू जल करार प्रकरणात पाकिस्तानचा लवादच बेकायदेशीर

काश्मीर प्रश्नात एर्दोगान यांची पुन्हा लुडबूड

एनएसईने आणला शेअर निवडीचा ‘लेन्स’

भाजपने आगामी काळातील विविध राज्यांमधील संघटनात्मक कामकाजाच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या केल्या आहेत. या फेरबदलात स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणा आणि छत्तीसगड, राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंड, तर सतीश पूनिया यांच्याकडे जम्मू-काश्मीर आणि पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version