घरराजकारणकर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करण्याची घोषणा

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करण्याची घोषणा

मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन दिवसांपासून दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी लातूरमधील दुष्काळी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली. यानंतर आता वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या आहेत. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्यात येईल, तसेच कोरड्या दुष्काळाबाबत शासन निर्णय काढण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. पीक विम्याच्या प्रश्नांवरही मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी वाशिमच्या मसला गावातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पाण्याची समस्या आणि जनावरांच्या चाऱ्याबाबतच्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. पाहणीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. “तुम्ही काळजी करू नका. आम्ही कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार आहोत. विम्याचे प्रश्नही मार्गी लावणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.

२०१६-१७ मध्ये वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी

कर्जमाफीबाबत फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली. २०१६-१७ मध्ये झालेल्या कर्जमाफीपासून जे शेतकरी वंचित राहिले होते, त्या सर्वांना कर्जमाफी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना शेतकऱ्यांनी हात उंचावून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ताफा थांबवून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमधील २५० मदरशांवर लागणार टाळे

गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज

‘धुरंधर’ने बदलला लडाखच्या पर्यटनाचा चेहरा

सीसीटीव्ही गायब, अहवालात क्लीनचिट; २०२३ बंगाल पंचायत निवडणुकीत गैरप्रकार

याआधी फडणवीस यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीचीही पाहणी केली होती. लातूरमध्ये १९७२ नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ असल्याचे त्यांनी सांगितले असून, दुष्काळग्रस्तांना सरकार वाऱ्यावर सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version