घरराजकारणहुमायून कबीरची अभद्र भाषा... अल्लाहने शुभेंदूंचे तिकीट बुक करावे

हुमायून कबीरची अभद्र भाषा… अल्लाहने शुभेंदूंचे तिकीट बुक करावे

या वक्तव्यावर भाजपचा संताप

पश्चिम बंगालमध्ये आम जनता उन्नयन पार्टीचे (एजेयूपी) संस्थापक हुमायून कबीर यांच्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी लवकरच पद सोडावे, यासाठी आपण प्रार्थना करणार असल्याचे सांगतानाच, “अल्लाह त्यांचे तिकीट बुक करो,” असे वक्तव्य कबीर यांनी केले. रेजीनगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याच हुमायून कबीर यांनी बाबरी मशिद बांधण्याचे आवाहन पश्चिम बंगाल निवडणुकीआधी केले होते. त्यासाठी पैसाही गोळा केला होता.

मुर्शिदाबाद येथे पत्रकारांशी बोलताना कबीर यांनी शुभेंदू अधिकारी यांनी अनर्गल भाषा वापरली. शुभेंदू यांनी मुख्यमंत्रीपदावर राहू नये आणि माजी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांच्या हत्या किंवा अपघाती मृत्यूंचा संदर्भ देत अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. कबीर म्हणाले, “मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन की त्यांनी (शुभेंदू) शक्य तितक्या लवकर हे जग सोडावे. अल्लाह त्यांचे तिकीट बुक करो. त्यामुळे अहंकाराचा अंत होईल.”

कबीर यांनी आपल्या वक्तव्यादरम्यान माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचाही अनैसर्गिक मृत्यू झालेल्या राजकीय नेत्यांच्या संदर्भात उल्लेख केला.

कबीर यांनी शुभेंदू अधिकारी सत्तेत आल्यानंतर “अहंकारी” झाल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्या सरकारच्या काळात अल्पसंख्याक समाजाला त्रास दिला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. आपल्या वक्तव्याचा उद्देश अधिकाऱ्यांच्या पदावर राहण्याला विरोध करणे हा असल्याचे कबीर यांनी स्पष्ट केले. त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटून माजी मुख्यमंत्री व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

माफी मागून मोकळे झाले होते, डोवालांविरुध्द खोटे विकणारे…

बंगालमधील २७ लाख नावे ममतांमुळेच वगळली!

आशियाई गेम्समधील भारताचे बॅडमिंटन आव्हान संपले

भारताची अर्थव्यवस्था १० टक्क्यांहून अधिक वेगाने वाढू शकते

…नंतर पश्चात्ताप

मात्र, त्यानंतर हुमायून कबीर यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. आपण मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले नव्हते आणि पोलीस छळाच्या आरोपांच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया होती, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर कबीर यांनी मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच सुवेंदू अधिकारी यांनी आपला पूर्ण कार्यकाळ पूर्ण करून पुढे पंतप्रधान व्हावे, असेही त्यांनी म्हटले. आपली मुख्य तक्रार पोलिसांकडून होत असलेल्या कथित छळाबाबत असल्याचे कबीर यांनी पुन्हा स्पष्ट केले.

भाजपकडून वक्तव्याचा निषेध

हुमायून कबीर यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय मतभेद असले तरी प्रतिस्पर्ध्याच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणे योग्य नसल्याचे भाजपने म्हटले. पश्चिम बंगालचे आरोग्यमंत्री शारद्वत मुखोपाध्याय यांनीही कबीर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राजकीय चर्चेची पातळी अत्यंत खालावल्याचे त्यांनी म्हटले.

मुखोपाध्याय म्हणाले, “एखादी व्यक्ती इतक्या निर्लज्जपणे असे काही बोलू शकते, याची मी कल्पनाही केली नव्हती. त्यांना शुभेंदू अधिकारी आवडत नसतील किंवा त्यांच्या धोरणांशी त्यांचे मतभेद असतील; पण एखाद्याच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करता येईल का? मी याचा तीव्र निषेध करतो.” ते म्हणाले की, “त्यांना कोणाच्या उपकारामुळे मुख्यमंत्री बनवण्यात आलेले नाही; जनतेने त्यांना मुख्यमंत्री बनवले आहे,” असे मुखोपाध्याय म्हणाले. कबीर यांना उद्देशून ते पुढे म्हणाले, “हुमायून कबीर यांनी लक्षात ठेवावे (कावळ्याच्या) शापाने गाय मरत नाही.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version