दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी इंडिया आघाडीतर्फे ‘देश बचाओ महारॅली’चे आयोजन करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. या रॅलीला संबोधित करताना पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विचित्र टीका केली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ते आम्हाला घराबाहेर पडू नका, असे सांगतात. त्यांनी आम्हाला नजरकैदेतही ठेवले होते. पण मी सांगते की, जे लढतात ते आयुष्य जगतात आणि जे घाबरतात ते मरतात. जे काफिर आहेत, ते दररोज घाबरतात. आगामी काळातील घोषणा आहे, ‘सेव्ह इंडिया, सेव्ह डेमोक्रसी’. सर्वांनी मिळून भाजपविरोधात लढले पाहिजे.”
पश्चिम बंगाल हे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेचे बळी ठरले असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
हे ही वाचा:
ब्रिटिश दाम्पत्याला एवढी भावली देशी रिक्षा की थेट घेऊन गेले मायदेशी!
पंजाबमध्ये ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच ‘आप’मध्ये बंडखोरी
मारुती सुझुकीची विक्री ऐतिहासिक उच्चांकावर
यूपीआयचा ऐतिहासिक विक्रम! ऑक्टोबरमध्ये दररोज एक लाख कोटींचे व्यवहार
त्या म्हणाल्या, “आम्ही माघार घेणार नाही. आम्ही प्राण देऊ, पण लढत राहू. आमच्या बंगालमध्ये लूट झाली; मात्र आता दिल्लीत लूट होऊ देणार नाही. आम्ही लोकशाहीचे रक्षण करू. भाजपसाठी एसआयआरचा अर्थ ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिलीफ’ असा आहे.”
निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना ममता म्हणाल्या, “सरकारने ईव्हीएम, लोकशाही, संविधान आणि जनतेच्या अधिकारांची लूट केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी बंगालमधील एक टक्का मते वगळली. आम्ही हरलो नाही, तर आम्हाला हरवण्यात आले. याचा बदला आम्ही राजकारणाच्या माध्यमातून घेऊ. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढू. सरकारने नोकऱ्या, लोकांचे जीवन आणि माता-भगिनींच्या सन्मानाची लूट केली आहे. निवडणूक प्रक्रियेचे अपहरण करण्यात आले आहे.
