घरस्पोर्ट्सपोल पोझिशन मिळविल्याबद्दल हॅमिल्टन खुश

पोल पोझिशन मिळविल्याबद्दल हॅमिल्टन खुश

मेक्सिको ग्रां प्रीमध्ये फेरारी संघासाठी पहिली पोल पोझिशन मिळवल्यानंतर लुईस हॅमिल्टन प्रचंड आनंदी झाला. सात वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या हॅमिल्टनने पोल पोझिशन मिळवण्यासाठीचा आपला प्रदीर्घ प्रतीक्षेचा काळ अखेर संपवला. यापूर्वी २०२३ मध्ये हंगेरियन ग्रां प्रीच्या पात्रता फेरीत त्याने अव्वल स्थान मिळवले होते.

४१ वर्षीय हॅमिल्टनने आपला माजी सहकारी आणि मर्सिडीजचा चालक जॉर्ज रसेल याला मागे टाकले. तर फेरारीमधील त्याचा सध्याचा सहकारी चार्ल्स लेक्लेर मेक्सिकोतील ‘ऑटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिग्ज’ सर्किटवर पात्रता फेरीत तिसऱ्या स्थानावर राहिला. कारकिर्दीतील १०५ वी पोल पोझिशन मिळवल्यानंतर ब्रिटिश चालकाला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडत होते.

पात्रता फेरी संपल्यानंतर हॅमिल्टन म्हणाला, “वा! खूप छान वाटत आहे. मी खूप आनंदी आहे. खरं सांगायचं तर, माझ्याकडे शब्दच नाहीत. हा संपूर्ण आठवडा खरोखरच खूप कठीण आणि आव्हानात्मक होता. पहिल्या सराव सत्रात (एफपी१) आम्ही ‘रेक’ या कारच्या एका भागाचा वापर केला होता. त्यानंतर काल इंजिनशी संबंधित समस्या निर्माण झाली, त्यामुळे आम्ही बराच मागे पडलो. मला दीर्घ अंतराच्या सरावाची (लाँग रन) संधीही मिळाली नाही. मात्र, संपूर्ण आठवडाभर आम्ही कारच्या सेटअपवर अतिशय चांगले काम केले.”

हे ही वाचा:

एका वर्षात भारतीय फलंदाजांनी मारले ४०० विक्रमी षटकार

१० लाखांच्या दाव्याचे रामलीला मैदानात दहन

वाळवंटातल्या ‘हिरवळी’चा धडा

इशान किशन ठरला यंदा टी-२०त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

तो पुढे म्हणाले, “आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि मागील शर्यतीतून अनेक गोष्टी शिकलो आहोत. मात्र, सर्व चालकांमधील स्पर्धा अतिशय चुरशीची आहे. उदाहरणार्थ, क्यू-२ मध्ये सुरुवातीला मला माझी लॅप पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही. माझ्या मते, इतर चालकांकडे सुरुवातीसाठी नवीन टायर होते.”

हॅमिल्टनने यापूर्वी २०१६ मध्येही मेक्सिकोमध्ये पोल पोझिशन मिळवली होती. त्यामुळे एकापेक्षा अधिक वेळा पोल पोझिशन मिळवलेले हे त्याच्या कारकिर्दीतील २२ वे सर्किट ठरले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version