घरराजकारणमुस्लिमही काँग्रेसला मते देईनात...गौरव गोगोई राजीनामा द्या!

मुस्लिमही काँग्रेसला मते देईनात…गौरव गोगोई राजीनामा द्या!

आसाममधील नौगाव पोटनिवडणुकीत काँग्रेसची मोठी पीछेहाट

आसाममधील नौगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून, काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याचे मतमोजणीच्या आकडेवारीवरून दिसून आले. या खराब कामगिरीनंतर आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्यावर टीका सुरू झाली आहे. काँग्रेसचे माजी मित्रपक्ष असलेल्या रायजोर दलाचे प्रमुख अखिल गोगोई यांनी काँग्रेसच्या पराभवावरून गौरव गोगोई यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुस्लिम मतदारांचे प्रमाण ५५ टक्क्यांहून अधिक असलेल्या मतदारसंघात काँग्रेसची झालेली पीछेहाट म्हणजे आसाममधील भाजपविरोधी शक्तींसाठी शोकांतिका असल्याचे अखिल गोगोई यांनी म्हटले.

अखिल गोगोई यांनी गौरव गोगोई यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नसल्याची टीका केली. काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत आणि भाजपविरोधी लढ्याच्या रणनीतीत मूलभूत बदल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना अखिल गोगोई म्हणाले, “काँग्रेसच्या मतांमध्ये अल्पसंख्याकांचा वाटा २५ टक्क्यांवरून घसरून केवळ ५ टक्क्यांवर आला आहे.”

ते पुढे म्हणाले, “अल्पसंख्याकबहुल या मतदारसंघात भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. काँग्रेसचा हा ऐतिहासिक पराभव आहे. माझ्या मते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी आजच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा.”

हे ही वाचा:

जंतरमंतर आंदोलनापुर्वी दिल्ली पोलिसांचे नागरिकांना खुले पत्र

१३ अमेरिकन सैनिकांची हत्या करणाऱ्या हसनच्या मृत्युदंडाचे थेट प्रक्षेपण

ध्रूव राठीचा व्हिसा तपासा…

बृजभूषण सिंह प्रकरण पुन्हा न्यायालयात!

शुक्रवारी यापूर्वी आसामी वृत्तवाहिनी डीटी ३६५ शी बोलतानाही अखिल गोगोई यांनी अल्पसंख्याक मतदारांचा पाठिंबा टिकवून ठेवण्यात काँग्रेसला आलेले अपयश चिंताजनक असल्याचे म्हटले होते. नौगावमधील निकाल हा पक्षासाठी ऐतिहासिक धक्का असल्याचे सांगत त्यांनी नेतृत्व आणि भाजपविरोधातील रणनीती या दोन्हींचा पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली. नौगावमधील निकालावरून अखिल गोगोई यांनी काँग्रेसवर केलेली टीका अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा काँग्रेसने ३ सप्टेंबर रोजी रायजोर दलासोबतची युती औपचारिकरीत्या संपुष्टात आणली होती. काँग्रेसने रायजोर दलाच्या नेत्यांवर वारंवार काँग्रेसविरोधी टीका केल्याचा आणि आघाडीच्या सहकार्याबाबत ठरलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

शिवसागरचे आमदार अखिल गोगोई यांनी यापूर्वी काँग्रेसवर आपल्या पक्षाला दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यांनी नौगाव पोटनिवडणुकीत स्वतःच्या पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये अखिल गोगोई यांनी रायजोर दलाची स्थापना केली. आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांपैकी या पक्षाकडे सध्या दोन जागा आहेत. अखिल गोगोई हे शिवसागरचे, तर मेहबूब मुक्तार हे धिंग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

काँग्रेसला बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक अशा दोन्ही समाजघटकांमधील पाठिंबा गमवावा लागत असल्याचे या निकालातून स्पष्ट होत असल्याचा दावा अखिल गोगोई यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version