घरक्राईमनामायावेळी तरी अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहणार का?

यावेळी तरी अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहणार का?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी ईडीच्या समन्सला उत्तर दिले नव्हते. मात्र आता त्यांना ईडीला चुकवणे शक्य होणार नाही.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून पुन्हा समन्स पाठवण्यात आला आहे. बुधवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीने आदेश दिले आहेत. अनिल देशमुखांना पाठवण्यात आलेला हे पाचवा समन्स आहे. त्यामुळे अनिल देशमुख आता तरी चौकशीला हजर राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

हे ही वाचा:

मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस

मच्छीमारांच्या अडचणींना उधाण

रॉजर फेडररचा टेनिसमधून संन्यास? काय झाले आहे वाचा…

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

दरम्यान,  ईडीने अनिल देशमुखांवरील कारवाई सुरू ठेवली आहे. त्यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे. याआधी अनिल देशमुख यांना चार वेळा ईडीकडून समन्स पाठवण्यात आला. पण ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. आता पाचव्यांदा समन्स बजावल्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला. त्यानंतर अनिल देशमुख आणि इतरांविरोधात  देखील ईडीने गुन्हा दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे ईडीने अनिल देखमुख आणि  त्यांच्या कुटुंबाच्या ४.२० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version