घरराजकारणमतदार यादीत नाव आहे म्हणून आंदोलन!

मतदार यादीत नाव आहे म्हणून आंदोलन!

शिवाजी पार्कात आंदोलकाचे अजब उत्तर

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात येत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर हे आंदोलन करण्यात येत असल्याचे पक्षाचा संस्थापक अभिजित दिपके याने सांगितले आहे.

दरम्यान, आंदोलनादरम्यान एका आंदोलक आणि पत्रकारामधील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. पत्रकाराने या आंदोलकाला तो कुठून आला असल्याचे विचारले. त्यावर त्याने ‘विक्रोळी’ असे उत्तर दिले. त्यानंतर ‘कशासाठी आला आहात?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आंदोलकाने ‘मोदी सरकार चोर आहे’, अशी घोषणा गर्दीसोबत दिली. यानंतर पत्रकाराने थेट प्रश्न केला, ‘तुमचं नाव मतदार यादीत आहे का?’ त्यावर आंदोलकाने ‘आहे ना’, असे उत्तर दिले. पत्रकाराने पुन्हा, ‘मग कशासाठी आंदोलन?’ असा सवाल केला. त्यावर आंदोलकाने दिलेले उत्तरही चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने पुन्हा ‘आहे म्हणून’, असे उत्तर दिल्याचे व्हिडीओमध्ये ऐकायला येते. यानंतर पत्रकारालाही आपले हसू आवरले नसल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

एमपीएससी सचिव महेंद्र हरपळकरांची बदली

“हल्ला झाला तेव्हा हनुमान चालीसा म्हणत होतो, हनुमानजींनीच वाचवले!”

“हिंदुस्तानी जीव घेणारे नाही, जीव वाचवणारे”

फ्लाय दुबईचा ‘तो’ हल्लेखोर वैमानिक जिहादी विचारसरणीचा

या व्हिडीओनंतर संबंधित आंदोलकाला आंदोलनाचा नेमका मुद्दाच माहित नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. मतदार यादीत नाव असतानाही केवळ मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यासाठी काही लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शिवाजी पार्क येथील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही आंदोलन करण्यावर अभिजित दिपके ठाम राहिले. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version