घरविशेष४ ऑक्टोबरला मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

४ ऑक्टोबरला मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

लोकल सेवांवर परिणाम

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. या काळात सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्याचप्रमाणे घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकलही विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हे ही वाचा:
एमपीएससी सचिव महेंद्र हरपळकरांची बदली

कटरा-बनिहाल रेल्वेमार्गावर वेगाचा नवा विक्रम

दिनू मोरियाला ‘मिठी’ भोवली

जगाला शांततेचा मार्ग भारतच दाखवू शकतो
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यानच्या काही सेवा तसेच सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ दरम्यानच्या सेवा रद्द राहतील. याशिवाय ट्रान्स-हार्बर मार्गावरही पनवेल-ठाणे आणि ठाणे-पनवेल दरम्यानच्या काही सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या सेवा सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ आणि ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या कालावधीत रद्द राहतील.
दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मुंबई ते वाशी मार्गावर विशेष उपनगरीय रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत. तसेच ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा उपलब्ध राहतील. पोर्ट मार्गावरील सेवाही सुरू राहणार आहेत. पायाभूत सुविधांची देखभाल, दुरुस्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version