घरराजकारणराज ठाकरे म्हणतात, गणेशोत्सवात दंगली घडवल्या जाणार!

राज ठाकरे म्हणतात, गणेशोत्सवात दंगली घडवल्या जाणार!

पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केला अजब दावा

- Advertisement -

येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात आणि देशातही गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळणार असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना या उत्सवात दंगली होतील असा अजब दावा केला आहे. मुंबईमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना या गणेशोत्सवात दंगली घडविण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांनी हा दावा करण्यामागे नेमके कारण सांगितलेले नाही.

राज ठाकरे म्हणाले की, या दंगली घडविण्यासाठी मोठी यंत्रणा राबवली जात आहे. या राज्याचे नागरीक म्हणून तुम्ही सतर्क राहा.  तुम्ही या गोष्टीपासून दूर राहा असा सल्लाही त्यांनी दिला. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात हा मेळावा झाला.

ते म्हणाले की, मला सर्वाधिक भीती आहे की, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात दंगली घडवल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्यात अडकले पाहिजे, तुमचं इतर गोष्टीकडं दुर्लक्ष झालं पाहिजे. आताच मुंबईत त्याची झलक पाहिली तुम्ही. एक दोन घटना घडल्या, ही सुरुवात आहे. जो सुजाण हिंदू-मुस्लिमांनी सतर्क राहा. आपल्या नावाने, त्यांच्या नावाने यामध्ये कुणीतरी घुसवतील आणि दंगली घडवतील. आता देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.” असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे

हे ही वाचा:

गणेशोत्सवातील डीजेविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले!

२० वर्षांच्या तरुणाने एकट्याने बदललं नदीचं रूप

ओव्हरटेकच्या नादात दुचाकीला धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्पेशल २६’ स्टाईल बनावट आयकर धाड

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात डीजेची खूप चर्चा होते आहे. विशेषतः पुण्यात या वादाला तोंड फुटले. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले हे कळले नसल्याचे सांगत विधान केले की, या विषयावरती त्यादिवशी मुख्यमंत्री काय बोलले, मला अजून नाही कळलं माझी बातमी जर चुकीची असेल तर नागपुरात डीजे बंद झालाय, बाकी महाराष्ट्रामध्ये आहे, याच्यावरती मुख्यमंत्री सांगतात कायद्याने आम्हाला बंदी नाही आणता येत, मग नागपुरात कसं बंद झालं, याचं कारण तुम्ही डीजेच्या वादात गुंतता डॉल्बीच्या वादात गुंतता. सध्या शिक्षण मिळतंय का? नाही मिळत, नोकऱ्या मिळतायत का? नाही मिळत, नोकऱ्या मिळाल्या तर टिकणार की नाही टिकणार माहित नाहीये, नोकरी लागली म्हणून लग्न करावं तर नोकरी हातातून जातीय, कुटुंब कस पाळावं कल्पना नाही, एखादा आजार आला घरामध्ये तर कर्जबाजारीपणा येतोय, या सगळ्या परिस्थितीमधून तुमचं दुर्लक्ष व्हावं म्हणून हे सगळं चाललंय.

अमित ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा

अमित पुण्याला गेला असताना पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्यावरून वाद निर्माण झाला, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्व मंडळींच्या रांगेत दुसरं कोणी बसू शकत नाही. सरकारी कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असायला पाहिजे का? तर असायला पाहिजे, पण दुसऱ्या भिंतीवरती, त्या रांगेत नाही, मला असं वाटतं जे सरकारी आस्थापना आहेत, शाळा आहेत, इतर काही गोष्टी असतील, त्यांनी फोटो लावावेत फक्त ही गोष्ट त्यांनी नीट पाळणं गरजेचं आहे, कोणाबरोबर कुठले फोटो लागले पाहिजेत आणि कुठल्या रांगेमध्ये कोणाचे फोटो असले पाहिजेत आणि पंतप्रधान असतील कोणी असेल त्यांचे फोटो कोणत्या रांगेत, भिंतीवरती लागले पाहिजेत, हे कळले पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version