घरविशेषओव्हरटेकच्या नादात दुचाकीला धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

ओव्हरटेकच्या नादात दुचाकीला धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

- Advertisement -

वांद्रे पश्चिम येथील वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरील उड्डाणपुलावर भरधाव आलिशान कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २० वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुभम प्रजापती असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कारचालक युवराज राजकुमार बाहेती (२८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी रात्री १०.३८ च्या सुमारास सी-लिंक, रेक्लमेशनजवळ अपघात झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर वांद्रे पोलिसांचे अंमलदार विनायक जयकर आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरील एस. व्ही. रोडच्या वरील पुलावर शुभम रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला. त्याची दुचाकीही जवळच पडली होती. शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी त्याला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री १२.१२च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे ही वाचा:

मुंबई उच्च न्यायालयाचा ‘ओल्ड मॉन्क’च्या लेबलवर आक्षेप

समाजवादी पक्षाचा पदाधिकारी रस्त्यावरच पढत होता नमाज, एफआयआर दाखल

जंतर मंतर हल्लाप्रकरणी स्वतंत्र भारद्वाजला एक दिवसाची कोठडी

शिक्षकदिनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी पंतप्रधानांची मनमोकळी ‘बात’

दरम्यान, घटनास्थळापासून सुमारे १०० फूट अंतरावर काळ्या रंगाची कार (आरजे ०३ यूसी ०३३३) उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीत बाहेतीने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक लागल्याची कबुली दिली. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी त्याच्यावर BNS कलम २८१, १०६(१) आणि मोटार वाहन कायद्यातील कलम १८४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version