घरराजकारणहे पवारांचे जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळते

हे पवारांचे जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळते

राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

मतदारसंघ फेररचना विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सूचक टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी शरद पवार यांच्या राजकीय रणनीतीवर भाष्य केले. ‘हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं,’ असे म्हणत राज ठाकरे यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर केलेल्या विधानाची आठवण करून दिली. त्यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपसोबत सत्तेत प्रवेश केला होता. त्यानंतर दुसरा गटही भविष्यात सत्तेच्या दिशेने जाईल, असे भाकीत राज ठाकरे यांनी केले होते. आता त्याच विधानाचा संदर्भ देत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांवर निशाणा साधला.
हे ही वाचा:
दुसऱ्या कसोटीत भारताचा डाव गडगडला

खर्गे म्हणतात, अनुसूचित जाती-जमातींच्या विरोधात पुनर्रचना विधेयक

‘बाहुबली २’चा विक्रम मोडला! ‘रामायण’ जगभरातील कमाईत तिसऱ्या स्थानी

महिला आरक्षण अंमलबजावणीतला प्रत्येक अडथळा करणार दूर

‘दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणालो तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. त्यांच्या या विधानाचा रोख शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेकडे असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मतदारसंघ फेररचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाठिंबा देण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा मसुदा पूर्ण वाचल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पोस्टमुळे राज्यातील राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version