घरराजकारणलाडावलेल्या राजपुत्राला खुश करण्यासाठी प्रतिकात्मक संसद

लाडावलेल्या राजपुत्राला खुश करण्यासाठी प्रतिकात्मक संसद

सुधांशू त्रिवेदी यांनी उडविली खिल्ली

भारतीय जनता पक्षाने शनिवारी जागतिक बँकेच्या ‘इंडिया पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ’ अहवालातील निष्कर्षांचे स्वागत केले. या अहवालामुळे इंडी आघाडीच्या ‘प्रतिकात्मक संसदेची’ खिल्ली उडाली असल्याचे भाजपने म्हटले आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘सार्वजनिक महाभियोग’ कार्यक्रम आयोजित केला होता.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, या अहवालातून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठ्या लोकसंख्येला गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट होते.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, भारतात अराजकता निर्माण करण्याचे मनसुबे अपयशी ठरल्यानंतर काँग्रेसने आपल्या लाडावलेल्या राजपुत्राला खूश करण्यासाठी ‘नकली संसद’ अर्थात बनावट नाट्य आयोजित केले. मात्र, नेमके त्याच वेळी जागतिक बँकेच्या माध्यमातून एक ठोस सत्य देशासमोर आले.

जागतिक बँकेच्या २०२५ च्या अहवालानुसार, २०११ ते २०२३ या कालावधीत भारताने बहुआयामी गरिबी कमी करण्यात मोठे यश मिळवले आहे. एक दशकापूर्वी भारतातील २७ टक्क्यांहून अधिक लोक अत्यंत गरिबीत जीवन जगत होते. मात्र, आज हे प्रमाण घसरून केवळ २.६ टक्क्यांवर आले आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भाजप खासदारांनी सांगितले की, भारतासंदर्भात जागतिक बँकेच्या ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘गरीबी आणि समानता अहवालात’ आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. दररोज ४.२० डॉलर या निम्न-मध्यम उत्पन्न गटाच्या गरिबीच्या निकषाखाली जीवन जगणाऱ्या लोकांचे प्रमाण २०११ मधील ५७.७ टक्क्यांवरून २०२३ मध्ये १६.१ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

हे ही वाचा:

बंगळुरूतील पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का

जिओच्या दमदार लिस्टिंगनंतर रिलायन्सचीही घोडदौड

‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मण यांचा आज वाढदिवस

सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वज फडकला

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्रिवेदी म्हणाले की, ऑगस्ट २०१३ मध्ये राहुल गांधी यांनी गरिबी ही एक मानसिकता असल्याचे म्हटले होते. म्हणजेच गरिबी ही केवळ मनाची अवस्था आहे आणि बाकीच्या गोष्टी आपोआप ठीक होतील, असा त्याचा अर्थ होतो. दुसरीकडे, डॉ. मनमोहन सिंग यांनीही एकदा पैसा झाडावर उगवत नसल्याचे म्हटले होते.

भाजप खासदार म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दृष्टिकोन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी यांच्यात खूप मोठा आणि स्पष्ट फरक आहे. गरिबीला केवळ मानसिकता मानून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने भारतातील मोठ्या लोकसंख्येला भीषण गरिबीत अडकवून ठेवले होते. मात्र, जागतिक बँकेच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की, त्यावेळी म्हणजेच काँग्रेसच्या सत्ताकाळात गरिबीच्या रेषेखाली असलेले २७.६ टक्के लोक आता गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यामुळे जागतिक बँकेच्या या आकडेवारीने बनावट संसदेची खिल्ली उडवली आहे, असे मला वाटते.

सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत एनडीए सरकार देशातून गरिबी दूर करण्यासाठी काम करत आहे, तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पंतप्रधान मोदी यांना सत्तेवरून हटवण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता देशात अराजकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version