घरराजकारणपंजाबमध्ये ‘आप’ची साथ सोडत तीन नेते भाजपमध्ये

पंजाबमध्ये ‘आप’ची साथ सोडत तीन नेते भाजपमध्ये

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग

पंजाबमध्ये २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आलेला असताना सत्ताधारी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील तीन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये सनौरचे आमदार हरमीत सिंह पठानमाजरा, समाना मतदारसंघाचे आमदार चेतन सिंह जौरामजरा आणि अमृतसर उत्तरचे माजी आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पटियाला जिल्ह्यातील सनौरचे आमदार हरमीत सिंह पठानमाजरा आणि समानाचे आमदार चेतन सिंह जौरामजरा यांनी रविवारी ‘आप’च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर लगेचच या दोघांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. या यादीत त्यांच्या मतदारसंघांचा समावेश नव्हता. दोघांनाही पक्षाने यापूर्वीच कथित पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून निलंबित केले होते.

दरम्यान, अमृतसर उत्तरचे आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांनीही सोमवारी पंजाब विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आयपीएस अधिकारी असलेल्या कुंवर विजय प्रताप यांना जून २०२५ मध्ये पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून ‘आप’मधून पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.

हे ही वाचा:

प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’च्या ११ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

दिल्लीच्या प्रदूषण मोहिमेत पहिल्याच दिवशी ६८ लाखांचा दंड

‘मे डे’ कॉलनंतर काही क्षणांतच फ्लोरिडात खासगी जेट कोसळले

ममता म्हणतात, जे काफिर ते घाबरतात!

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तिन्ही नेत्यांनी पंजाबमधील कायदा-सुव्यवस्था, अमली पदार्थांचे वाढते जाळे आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवरून आम आदमी पार्टी सरकारवर टीका केली. पंजाब विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना तीन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी सुरू झाल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version