हिवाळ्यात वाढणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या विशेष कारवाई मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली. विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ६८.४ लाख रुपयांचा दंड आणि पर्यावरणीय भरपाई वसूल करण्यात आली. दिल्लीच्या सीमांवर तपासणीदरम्यान १,५३९ वाहनांना प्रवेश नाकारून परत पाठवण्यात आले.
हिवाळी कृती आराखड्यांतर्गत दिल्ली वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाने सुमारे १४,९३० वाहनांची तपासणी केली. दिल्लीबाहेर नोंदणीकृत आणि बीएस-६ उत्सर्जन मानकांपूर्वीच्या वाहनांच्या प्रवेशावरील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. या कारवाईत १२७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर ६२ वाहने जप्त करण्यात आली. वाहन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राशिवाय धावणाऱ्या वाहनांवरही मोठी कारवाई करण्यात आली. अशा ५६६ वाहनांना दंड ठोठावण्यात आला असून, त्यातून ५६.६ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये दिल्ली वाहतूक पोलिसांनी ४९.३ लाख रुपये, तर परिवहन विभागाने ७.३ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
हे ही वाचा:
‘मे डे’ कॉलनंतर काही क्षणांतच फ्लोरिडात खासगी जेट कोसळले
ममता म्हणतात, जे काफिर ते घाबरतात!
रामलीलाचा ४० टक्के भाग रिकामा, होते कुठे १० लाख लोक?
नागपुरात लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने १२ सराफांना धमकी
दरम्यान, बांधकाम आणि पाडकामाच्या ठिकाणांवरील धूळ प्रदूषणावरही प्रशासनाने कारवाई केली. एकूण ३०० बांधकाम स्थळांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३२ ठिकाणी धूळ नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. या प्रकरणांत ९.८ लाख रुपयांची पर्यावरणीय भरपाई आकारण्यात आली. अनेक ठिकाणांना काम बंद करण्याचे आदेश तसेच कारणे दाखवा नोटिसाही बजावण्यात आल्या.
