राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली रविवारी दिल्लीत झालेल्या रामलीला मैदानावरील सभेला १० लाखांची गर्दी होईल, असा दावा गेल्या अनेक दिवसांपासून केला जात होता पण प्रत्यक्षात या सभेला अवघे २८ ते ३० हजार लोक आल्याचे टीव्ही चॅनेलवरच्या दृश्यातून दिसत होते. त्यामुळे एक लाखभर लोकही या सभेला जमवता आले नसल्याबद्दल भाजपाकडून खरपूस समाचार घेतला गेला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रामलीला मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी राहुल गांधी हे उघड्या गाडीतून सभास्थळी निघाले. पण त्यावेळीही फार मोठी गर्दी त्यांच्या अवतीभवती नव्हती. प्रत्यक्षात राहुल गांधी हे सकाळी ११ वाजता गाडीतून निघणार होते. पण त्यांना निघण्यासाठीच १२.३० वाजले. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी जवळपास ३ वाजले. तोपर्यंत सभास्थळी आलेले लोक हे ताटकळत उभे राहिले होते.
यावेळी बऱ्याच कालावधीनंतर इंडी आघाडीचे सगळे सदस्य एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र त्यांचे नेते म्हणून राहुल गांधींनाच एकप्रकारे पसंती मिळाली का, याबद्दलही चर्चा रंगली. मात्र एवढ्या सगळ्या पक्षांचे लोक एकत्र येऊनही लाखभर लोकही का जमवता आले नाहीत, असा सवालही लोक विचारत होते.
हे ही वाचा:
ममता म्हणतात, जे काफिर ते घाबरतात!
रामलीलाचा ४० टक्के भाग रिकामा, होते कुठे १० लाख लोक?
नागपुरात लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने १२ सराफांना धमकी
यूपीआयचा ऐतिहासिक विक्रम! ऑक्टोबरमध्ये दररोज एक लाख कोटींचे व्यवहार
३० ऑक्टोबरला जोरदार पाऊस पडलेला असल्यामुळे रामलीला मैदानावर चिखलाचे साम्राज्य होते. अशा परिस्थितीत जवळपास ३०-४० टक्के भागावर बसण्याची व्यवस्थाच करता आली नसल्याचे अनेक दृश्यांमध्ये दिसत होते. त्यामुळे अर्धेअधिक मैदान हे रिकामेच होते. पुढच्या भागात खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या मात्र तिथेही खचाखच गर्दी आहे, असे चित्र नव्हते. आलेले लोकही सर्वसामान्य जनता नसून विविध पक्षांचे कार्यकर्तेच आणण्यात आल्याचे दिसत होते.
ममतांचे गाणे
भाषणे सुरू झाल्यानंतर लोकांनीही मग काढता पाय घेतला. राहुल गांधींच्या भाषणआधी विविध नेत्यांची भाषणे झाली. त्यात राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, समाजवादीचे अखिलेश यादव, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपापले विचार मांडले. पण त्यात ममता बॅनर्जींनी ज्ञानेशकुमारांचा उल्लेख करताना ज्ञानेश व्हॅनिश येश पप्पा हे गाणे सादर केले. आमचा बंगाल लुटला गेला तशी आम्ही दिल्ली लुटू असे म्हणताना त्या थांबल्या आणि दिल्ली लुटणार नाही तर लोकशाही वाचवू असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.
भाजपाने मोदी कही नही जाएगा, याचा प्रचार केलेला असताना राहुल गांधी यांनी मात्र मोदी कुठे जाणारच नाहीत, आम्हीही त्यांना जाऊ देणार नाही. मोदींना जरी वाटले तरी आम्ही त्यांना कुठेही जाऊ देणार नाही, असे वक्तव्य राहुल गांधींनी केल्यामुळे त्याचीही चर्चा झाली.
