घरराजकारणज्ञानेश कुमारांच्या अडचणीत वाढ

ज्ञानेश कुमारांच्या अडचणीत वाढ

एसआयआरच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका

मतदार यादीतील नावांबाबत सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान कथितपणे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

याचिकेत तब्बल १३ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून कथितपणे वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच एसआयआरसह काही महत्त्वाचे निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या संमतीशिवाय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकतर्फी घेतलेले निर्णय बेकायदेशीर घोषित करावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
भारतातील पहिला स्वदेशी मायक्रो-GPU विकसित

गतविजेते सात्विक-चिराग पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत बाहेर

एमपीएससी पेपरफुटीचे प्रकरणी सांगली, बुलढाणा, नवी मुंबईतून चौघे गजाआड

जेवण बनवले नाही, म्हणून आईचा जीव घेतला!
याशिवाय लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कर्तव्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग आणि निवडणूक आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख सीमा खन्ना यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ३२ अंतर्गत खटला चालवण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने याचिकेतील आरोप फेटाळून लावले आहेत. एसआयआरशी संबंधित निर्णयांसह इतर सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीने तसेच एकमताने घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका बाजूला मतदारांची नावे वगळल्याचा आणि निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा दावा करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने निर्णयप्रक्रियेत कोणतीही फूट नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता या आरोपांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते आणि एसआयटी चौकशीची मागणी मान्य होते का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version