घरस्पोर्ट्सव्ही. ई.एस. लॉ कॉलेजची यशस्वी सुरुवात

व्ही. ई.एस. लॉ कॉलेजची यशस्वी सुरुवात

विधी चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी च्या न्यू लॉ कॉलेज, मुंबई आणि मुंबई क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या विधी चषक क्रिकेट स्पर्धेला इस्लाम जिमखाना, मारिन लाईन्स येथे प्रारंभ झाला. मुंबईतील १४ विधी महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून मुंबई क्रिकेट क्लबचे ज्वाला सिंग यांनी या स्पर्धंसाठी पुढाकार घेतला आहे. उदघाटन सोहळ्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव निलेश भोसले, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे माजी चेअरमन विठ्ठल कोंडेदेशमुख , न्यू लॉ कॉलेज च्या प्रिन्सिपल डॉक्टर शिवानी शेलार एम.सी.ए. चे माजी संयुक्त सचिव दीपक पाटील, ज्वाला सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

सहभागी संघ

न्यू लॉ कॉलेज , मुंबई, आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज, वसंतदादा पाटील प्रतिष्ठान लॉ कॉलेज, सायन, रिझवी लॉ कॉलेज, वांद्रे, के.ई.एस. जयंतीलाल पटेल लॉ कॉलेज, कांदिवली, अग्नेल स्कूल ऑफ लॉ, जी .एन.वि .एस. लॉ कॉलेज, सिद्धार्थ लॉ कॉलेज, फोर्ट, डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेज, चेंबूर कर्नाटक कॉलेज ऑफ लॉ, कमलताई कथोरे लॉ कॉलेज, मुरबाड, सुभाष देसाई लॉ कॉलेज, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे लॉ कॉलेज, अंजुमन इस्लाम ए.आर.अंतुले लॉ कॉलेज.

हे ही वाचा:

जैशची महिला शाखा देशात सक्रीय आहे का?

मुंबईच्या नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्स आणि चोरीचा थरार

ARCS अंधेरीकडून T20 मुंबई लीगसाठी भव्य ट्रायल्स

यूएईचे कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तानने सौदी अरेबियासमोर पसरले हात!

सलामीच्या सामन्यात विवेकानंद एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज संघाने मयूर कांबळे याच्याअष्टपैलू कामगिरीमुळे चेंबूर कर्नाटक लॉ कॉलेज संघाला पराभूत केले. मयूर कांबळे याने प्रतिस्पर्धी संघाला १४४ धावांत रोकताना ९ धावांत २ विकेट्स मिळविल्या आणि नंतर या आव्हानाचा पाठलाग करताना ३३ चेंडूत ७८ धावा फाटकावताना आपल्या संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. चेंबूर कर्नाटक लॉ कॉलेज संघासाठी ऋषी पडवळ याने एकाकी झुंज देताना ५६ चेंडूत ९२ धावा ठोकल्या, मात्र त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ लाभली नाही.

दुसऱ्या एका लढतीत १४ ओव्हर्स मध्ये १०८ धावांचे लक्ष्य उभारणाऱ्या वसंत दादा पाटील कॉलेज संघाने प्रतिस्पर्धी फतहेर अग्नेल कॉलेज संघाला ९१ धावांवर रोखत विजयी सलामी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version