घरस्पोर्ट्ससुवर्णस्वप्नाचा चुराडा; मेस्सी म्हणाला, 'जखम खोल आहे'

सुवर्णस्वप्नाचा चुराडा; मेस्सी म्हणाला, ‘जखम खोल आहे’

फिफा विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात स्पेनकडून १-० असा पराभव झाल्यानंतर अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भावूक झाला. अंतिम सामन्यातील या पराभवाची वेदना व्यक्त करताना, “ही जखम खूप खोल आहे. ती भरून निघायला वेळ लागेल,” अशा शब्दांत मेस्सीने आपल्या भावना मांडल्या.

संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या अर्जेंटिनाला जेतेपदाची मोठी आशा होती. मात्र, अतिरिक्त वेळेत फेरान टोरेसने केलेल्या निर्णायक गोलमुळे स्पेनने १-० असा विजय मिळवत विश्वविजेतेपद पटकावले.

३९ वर्षीय मेस्सीने सोशल मीडियावर लिहिले, “दुःख खूप मोठे आहे आणि ही जखम भरून यायला वेळ लागेल. पण या स्पर्धेतील सुंदर आठवणी मी कायम जपून ठेवेन. आम्ही जिद्दीने लढलो, अनेक सामने शेवटच्या क्षणी जिंकले आणि संपूर्ण देशाने आमच्यावर दाखवलेला विश्वास कायम स्मरणात राहील.”

अर्जेंटिनाने साखळी फेरी सहज पार केली. त्यानंतर बाद फेरीतील सलग चार सामने अखेरच्या क्षणी गोल करत जिंकत संघाने अंतिम फेरी गाठली. मेस्सीने स्पर्धेत ८ गोल आणि ४ असिस्ट नोंदवत पुन्हा एकदा आपली महानता सिद्ध केली. तरीही स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार त्याला न मिळाल्याची खंत अनेक फुटबॉलप्रेमींनी व्यक्त केली.

बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा माजी स्टार असलेल्या मेस्सीने आपल्या सहकाऱ्यांचेही कौतुक केले. तो म्हणाला, “आज आमच्या कामगिरीचं पूर्ण मूल्यमापन करणं कठीण आहे. पण सलग दोन विश्वचषकांच्या अंतिम फेरीत पोहोचणं ही मोठी उपलब्धी आहे. प्रत्येक शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण देशाला एकत्र आणलं, याचा अभिमान आहे.”

यावेळी मेस्सीने विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या स्पेनचेही अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version