पुरुषांच्या अंडर-१९ आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत युवा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू मोहित उल्वाचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सौराष्ट्रच्या वरिष्ठ पुरुष संघात समावेश करण्यात आला आहे.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (एससीए) सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून ही माहिती दिली. असोसिएशनने म्हटले आहे की, “मोहित उल्वा इंदूर येथे सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ च्या साखळी सामन्यांसाठी सौराष्ट्र संघात सहभागी झाला आहे.”
सामायिक करण्यात आलेल्या छायाचित्रात उल्वा कर्णधार जयदेव उनाडकट, मुख्य प्रशिक्षक नीरज ओदेेदरा आणि प्रशिक्षक शेल्डन जॅक्सन यांच्यासोबत दिसत आहे. मात्र, इंदूर येथील द डेली कॉलेज मैदानावर हरियाणाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळाले नाही.
हे ही वाचा:
हिंदी महासागर क्षेत्रातील सहकार्याला बळ देत भारत-म्यानमारचा नौदल सराव
सॅमचा सत्यनारायण झाला, की जनरल हसन?
जे. पी. नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी तृणमूलचा नेता अटकेत
भारत- इजिप्तमध्ये वाहतूक, पुरवठा, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात संधी
सौराष्ट्रचे एलिट गट ब मधील आणखी काही सामने शिल्लक असल्याने उल्वाला खेळण्याची संधी मिळेल आणि तो वरिष्ठ पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मस्कतजवळील अल अमेरात येथील मिनिस्ट्री टर्फ ग्राउंड-२ वर झालेल्या अविस्मरणीय अंतिम सामन्यानंतर उल्वाला ही संधी मिळाली आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून अंडर-१९ आशिया चषकाचे जेतेपद पटकावले होते.
पाकिस्तानने दिलेल्या ३३८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था ८ बाद २५२ अशी झाली होती. त्यानंतर दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहित उल्वाने अवघ्या २६ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १८८ पेक्षाही अधिक होता.
