उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या आपल्या मूळ गावी आई सावित्री देवी यांना अखेरचा निरोप दिला. आईच्या निधनाने भावुक झालेल्या योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच अंत्ययात्रेदरम्यान आईच्या पार्थिवाला खांदाही दिला.
यावेळी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आईसोबतचे छायाचित्र शेअर करत संस्कृतमधील श्लोकातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया॥’
याचा अर्थ आईसारखी सावली, आधार, रक्षण करणारे आणि प्रिय कोणीही नाही, असा होतो.
हे ही वाचा:
जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी तरुणाला अटक
इस्रायलवरील राहुल गांधींच्या वक्तव्यावरून पिनराई विजयन संतापले
गोल्डी ब्रार एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीत
संविधानाचे पुस्तक दाखवणाऱ्या काँग्रेसची ‘मेटा’ कार्यालयात तोडफोड
दरम्यान, सावित्री देवी यांचे पार्थिव पंचूर येथून हरिद्वारला नेण्यात आले. चंडीघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे शुक्रवारी (२० नोव्हेंबर) निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. सावित्री देवी यांची प्रकृती वयोमानानुसार खालावली होती. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली होती.
