घरविशेषपश्चिम बंगालमध्ये १,२७९ मशिदींवरून भोंगे हटवले

पश्चिम बंगालमध्ये १,२७९ मशिदींवरून भोंगे हटवले

दोन दिवसांत सुमारे १,५०० धार्मिक स्थळांवर कारवाई

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये ध्वनीप्रदूषणाविरोधात राज्य पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेत दोन दिवसांत सुमारे १,५०० धार्मिक स्थळांवरील भोंगे (लाऊडस्पीकर) हटवण्याची कारवाई केली आहे. ध्वनीप्रदूषणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली असून, राज्यातील ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार ही मोहीम राबविण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील किमान १,२७९ मशिदी आणि १९९ मंदिरांना लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश देण्यात आले. ही कारवाई संपूर्ण राज्यभर ध्वनीप्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा भाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही धर्माला लक्ष्य न करता सर्व धार्मिक स्थळांवर समान निकषांनुसार कारवाई केली जात आहे. या मोहिमेद्वारे संबंधित धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनांना सार्वजनिक ध्वनिवर्धक यंत्रणा हटवण्यासह ध्वनीप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पश्चिम बंगाल ध्वनीप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० नुसार, सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सार्वजनिक लाऊडस्पीकर वापरण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच, ध्वनीची तीव्रता नियंत्रित ठेवण्यासाठी साउंड लिमिटर वापरणे आवश्यक असून, आवाजाची पातळी ५० ते ७५ डेसिबल या निर्धारित मर्यादेत ठेवणेही अनिवार्य आहे.

हे ही वाचा:

उपोषण सोडण्यासाठी राहुल गांधींकडून प्रतिसादच मिळाला नाही!

लैंगिक अत्याचार प्रकरणात तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल दोषी

‘बिइंग ह्यूमन’ ज्वेलरी प्रकरणात सलमान खानसह बहिणीला समन्स

“अटक झाली तरी मायदेशी परतणार” काय म्हणाल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान?

दरम्यान, अनेक मशिदी आणि मंदिरांच्या व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधींनी स्थानिक पोलिसांनी तोंडी सूचना देऊन लाऊडस्पीकर हटवण्यास सांगितल्याचा दावा केला आहे. याबाबत कोणताही लेखी आदेश देण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version