घरविशेष“हरमनप्रीतच्या धडाक्यात भारताची हॉकी सेना सज्ज!”

“हरमनप्रीतच्या धडाक्यात भारताची हॉकी सेना सज्ज!”

बिहारमधील राजगीर येथे २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या पुरुष हॉकी एशिया कपसाठी हॉकी इंडियाने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंह करणार असून, तरुणाई व अनुभवाचा उत्तम मेळ असलेले १८ सदस्यीय संघाचे स्वरूप जाहीर झाले आहे.

संघात गोलरक्षक म्हणून कृष्ण बी. पाठक आणि सूरज करूनकेरा यांची निवड झाली आहे. डिफेन्स लाईनमध्ये कर्णधार हरमनप्रीत, अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंह, सुमित, संजय आणि जुगराज सिंह यांचा समावेश आहे.

मिडफिल्डमध्ये मनप्रीत सिंह, विवेक सागर प्रसाद, राजिंदर सिंह, राजकुमार पाल आणि हार्दिक सिंह यांना स्थान देण्यात आले आहे. तर आक्रमणाची जबाबदारी मनदीप सिंह, अभिषेक, सुखजीत सिंह, शिलानंद लाकडा आणि दिलप्रीत सिंह यांच्यावर असेल.

नीलम संजीव जेस आणि सेल्वम कार्थी हे वैकल्पिक खेळाडू म्हणून निवडले गेले आहेत.

संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी सांगितले की, “आम्ही दबावाखालीही उत्तम खेळ करणारे अनुभवी खेळाडू निवडले आहेत. एशिया कप आमच्यासाठी महत्त्वाचा असून, विश्वचषक पात्रतेसाठी आम्हाला संतुलित आणि लढाऊ संघाची गरज होती. या संघाच्या प्रत्येक विभागात अग्रणी खेळाडू आहेत आणि टीमची एकजूट आमची सर्वात मोठी ताकद ठरेल.”

एशिया कपमध्ये भारताला पूल ए मध्ये स्थान मिळाले असून, त्याच्यासोबत जपान, चीन आणि कझाकिस्तान हे संघ आहेत. भारत आपला पहिला सामना २९ ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध, दुसरा सामना ३१ ऑगस्ट रोजी जपानविरुद्ध, तर तिसरा सामना १ सप्टेंबर रोजी कझाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version