घरविशेष“जय जयकार करा… महाराज झालेत नंबर वन!”

“जय जयकार करा… महाराज झालेत नंबर वन!”

दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकीपटू केशव महाराज बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी झळकला.

महाराजने मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडेत केवळ ३३ धावांत ५ गडी बाद करत संघाला ९८ धावांनी विजय मिळवून दिला. या दमदार कामगिरीनंतर तो ६८७ गुणांसह दोन स्थानांनी वर झेपावत क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

टॉप-१० वनडे गोलंदाज :

१. केशव महाराज (दक्षिण आफ्रिका)
२. महेश तीक्ष्णा (श्रीलंका)
३. कुलदीप यादव (भारत)
४. बर्नार्ड स्कोल्ट्ज (नामीबिया)
५. राशिद खान (अफगाणिस्तान)
६. मिचेल सेंटनर (न्यूझीलंड)
७. मॅट हेनरी (न्यूझीलंड) – एकमेव वेगवान गोलंदाज
८. वानिंदु हसरंगा (श्रीलंका)
९. रवींद्र जडेजा (भारत)
१०. अ‍ॅडम झंपा (ऑस्ट्रेलिया)

या यादीत तब्बल नऊ फिरकीपटू आहेत, तर मॅट हेनरी हा एकटाच वेगवान गोलंदाज आहे.

महाराजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द :

  • ५९ कसोटी सामने → २०३ बळी

  • ४९ वनडे सामने → ६३ बळी

  • ३९ टी-२० सामने → ३८ बळी
    ➡️ एकूण ३०४ आंतरराष्ट्रीय बळी

महाराज हा दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातला ३०० आंतरराष्ट्रीय बळी घेणारा पहिला फिरकीपटू ठरला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version