घरविशेषहातोहात बनवणारा एआय बायोमेट्रिक आयडेन्टिटी घोटाळा

हातोहात बनवणारा एआय बायोमेट्रिक आयडेन्टिटी घोटाळा

व्हीडिओच्या माध्यमातून दिला सावधगिरीचा इशारा

सध्या आपण सायबर गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण पाहतो. तुमचा मोबाईल हॅक करणे, तुमचे अकाऊंट हॅक करणे, तुम्हाला फोन करून फसवणूक करणे असे प्रकार अनेक होत असतात. त्यासंदर्भात तक्रारीही येत असतात. काहींचा सुगावा लागतो, तर अनेकवेळा पैसे परत मिळण्याची शाश्वती नसते. मात्र आता हे मार्ग सोडून लोकांना फसविण्याची एक नवी शक्कल शोधून काढली आहे.

मॉल्स, मेट्रो स्टेशन्स, सार्वजनिक ठिकाणे, बाजार येथे असेच मदतीच्या नावाखाली लूटमार करणारे लोक पाहायला मिळत आहेत, त्यापासून सावध राहण्याची गरज आहे. यासंदर्भात विवेक बजाज यांनी व्हीडिओ करून ही सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. तो व्हीडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

ते म्हणतात की, हे घोटाळे करणारे लोक वयाने प्रौढ, व्यवस्थित वेशभूषेत वावरत असतात. आपल्याला फोन वापरता येत नाही असे सांगून ते तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. आपली पेन्शन, मिळणारी सरकारी सवलत पाहायची आहे, असे नाटक करतात. किंवा आपल्या फोनमध्ये काहीतरी चुकीचे उघडले गेले आहे, ते जरा बघा म्हणत ते जवळ येण्याचा प्रयत्न करतात.

हे ही वाचा:

सामना एकीकडे, पाकिस्तानी व्हॉलीबॉल संघ गेला दुसरीकडे

वाकोल्यात विषारी वायूची बाधेमुळे सफाई कामगाराचा मृत्यू

मुंबईत ड्रग्ज तस्करी टोळीकडून ३७.१७ कोटींचे ‘केटामाईन’ जप्त

आता अग्निवीरांना राज्य सरकारी नोकरीत मिळणार स्थान

जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा फोन हातात घेता तेव्हा तो फोन एकतर व्हीडिओ कॉलवर किंवा स्क्रीन रेकॉर्डिंगवर असू शकतो. त्यात तुमचे चेहरे ओळखण्याची मुभा असते. (फेशियल रेकग्निशन) कुणीतरी तुम्हाला त्या व्हीडिओच्या माध्यमातून पाहात असते. पण त्याचवेळी तुमची प्राथमिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्नही सुरू असतो. हा नेहमीसारखा एखादा घोटाळा नाही तर हा एआय बायोमेट्रिक आयडेन्टिटी स्कॅम आहे. त्यांना त्यावेळी तुमचे पैसे नको असतात, तर त्यांना तुम्हीच हवे असतात. जर तुम्ही फोनला स्पर्श केला, तुम्ही बोललात, तुमचा चेहरा दिसत असेल तर तुमच्या बोटाचा स्पर्श, तुमचा चेहरा, तुमचा आवाज चोरला जातो. त्यातून आधुनिक एआयमार्फत तुमचा एक क्लोन तयार केला जातो. त्यानंतर जे होते ते तुमची लूट करण्यास कारणीभूत असते. तुमच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ते ऑनलाइन लोनसाठी, क्रेडिट कॅशसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे पुढील ३० मिनिटांत तुमच्या नावावर कर्ज घेऊन ती रक्कम ताब्यात घेतली जाऊ शकते.

त्यामुळे अशा व्यक्तींनी फोन दिला तर त्याला हातात घेऊन तो ऑपरेट करण्याचा प्रयत्न करू नका, त्यावरील कोणताही मजकूर वाचण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करू नका, किंवा त्यांनी तुमचा एखादा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याला नकार द्या. त्यांनी कॅमेऱ्यात पाहण्यास आणि काहीतरी बोलण्यास सांगितले तर ती विनंती धुडकावून लावा. शिवाय, आपल्याला कुणी फसवणार नाही, आपण कायम सावध असतो, अशा भ्रमात राहू नका, असे आवाहनही बजाज यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version