घरविशेषजामा मशिदीभोवतीच्या अतिक्रमणांवर बुलडोझर

जामा मशिदीभोवतीच्या अतिक्रमणांवर बुलडोझर

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापलिकेकडून कारवाई

राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीच्या परिसरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिल्ली महापालिकेने (MCD) सोमवारी सकाळपासून परिसरातील सार्वजनिक जागा आणि उद्यानांमधील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेच्या पथकांनी सकाळीच जामा मशिदीच्या आसपासच्या भागात पोहोचून सार्वजनिक जागांवर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामं आणि इतर अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिसरातील किमान तीन उद्यानांमधील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे. जामा मशिदीच्या आसपासच्या परिसरातील बेकायदा बांधकामं आणि अतिक्रमणांचं सर्वेक्षण करून त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दिले होते. त्यानंतर महापालिकेकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या पथकांनी सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून उभारलेल्या संरचना हटवण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी म्हणून केली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कारवाईदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

हे ही वाचा:

दिल्लीत स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; चालक-कंडक्टर अटकेत

दुर्घटनेनंतर चीन – नेपाळ यांच्यात ‘तू तू मैं मैं’

जॉर्डनमधील दोन अमेरिकी तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले

नेपाळमधील मृतांचा आकडा ८०० पार; ४ हजारांहून अधिक बेपत्ता

दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या जामा मशिदीच्या आसपासचा परिसर हा जुन्या दिल्लीतील अत्यंत गजबजलेला भाग आहे. सार्वजनिक जागा, उद्यानं आणि इतर ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांविरोधात ही कारवाई करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version