घरविशेषटोरेस घोटाळ्याचा मुख्य आरोपी ईडीच्या ताब्यात!

टोरेस घोटाळ्याचा मुख्य आरोपी ईडीच्या ताब्यात!

रोमानियातून भारतात आणले

मुंबईत गाजलेल्या ‘टोरेस ज्वेलरी’ गुंतवणूक फसवणूक आणि मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाला (ED) मोठे यश आले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि युक्रेनचा नागरिक असलेल्या ओलेक्सांद्र झापिचेंको उर्फ अ‍ॅलेक्स याला ईडीच्या पथकाने थेट रोमानियातून भारतात आणले आहे. संयुक्त अरब अमिरातीमार्गे त्याला भारतात आणण्यात आले असून, आता या बहुचर्चित प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.

२०२५ मध्ये मुंबईत उघडकीस आलेल्या गुंतवणूक फसवणूकप्रकरणी झापिचेंकोचा शोध सुरू होता. त्याला शोधून भारतात आणण्यासाठी इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या पथकाने त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले. गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रोख रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करण्याचे काम झापिचेंको करत असल्याचा आरोप आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर रोख आर्थिक व्यवहार सुलभ करण्यातही त्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. या व्यवहारांचा संबंध आर्थिक फसवणुकीशी निगडित मोठ्या मनी लाँडरिंग नेटवर्कशी असल्याचा ईडीला संशय आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

ब्रह्मोसनंतर आता आकाश, पिनाकाच्या खरेदीत फिलिपाइन्सला स्वारस्य

सावरकरांच्या केलेल्या अपमानावरून शिवसेनेने सोनियांचे पुस्तक फाडले

गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम अन्यत्र कशी वळवण्यात आली, परदेशातील क्रिप्टोकरन्सी वॉलेट कोणाच्या नियंत्रणाखाली होती आणि हवालाच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार कसे करण्यात आले, याबाबत ईडी त्याची चौकशी करणार आहे. याशिवाय फरार असलेल्या ओलेना स्टोयानसह अन्य आरोपींचा ठावठिकाणा शोधण्याचाही ईडीचा प्रयत्न आहे. गुन्ह्यातून मिळालेली रक्कम परदेशात पाठवण्यासाठी कोणत्या आर्थिक मार्गांचा वापर करण्यात आला, याचाही तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version