घरविशेषपुन्हा उघडणार बिग बॉसचे दार, येणार सिझन चार

पुन्हा उघडणार बिग बॉसचे दार, येणार सिझन चार

मराठी रियालिटी शो च्या विश्वात अतिशय लोकप्रिय ठरलेला मराठी बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे. बिग बॉस या रियालिटी शोचे मराठीतील चौथे पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे आता या चौथ्या सीजनमध्ये बिग बॉसच्या घरात कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

हिंदी मध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस या रियालिटी शो च्या मराठी पर्वाला काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला असून बघता बघता या खेळाचे ३ सीजन मराठीत पार पडले. त्यामुळे बिग बॉसचे चौथे पर्व केव्हापासून सुरु होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती.

हे ही वाचा:

नितीन गडकरींच्या हस्ते हैद्राबादमध्ये १२ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे आणि ७ सीआरआयएफ प्रकल्पांचे उद्घाटन

कीर्तनकार प्रकरणी नागरिकांच्या रोषानंतर पोलिसांचा माफीनामा

मुंबईकरांची एसी लाईफलाईन झाली स्वस्त

धुळ्यापाठोपाठ आता नांदेडमध्येही तलवारी पकडल्या

राडे, भांडण, कल्ला, रोजचे टास्क, गॉसिपिंग, राजकारण अशा विविध पैलूंनी नटलेला बिग बॉसचा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे होस्ट म्हणून या शो चे कामकाज पाहतात. तर विविध क्षेत्रातले प्रसिद्ध, वादग्रस्त आणि चर्चेतील चेहरे या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले पाहायला मिळतात.

कलर्स मराठी वाहिनीवर दिसणाऱ्या या स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची सुरुवात नेमकी कधीपासून होणार हे अद्यापही निश्चित झाले नाहीये. पण असे असले तरी देखील हा शो प्रेक्षकांचे तितकेच मनोरंजन करेल याबाबत शंका नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version