घरविशेषहिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!

हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!

अजित डोवाल यांचे प्रतिपादन

हिंदी महासागर हा देशांमधील दरी निर्माण करणारा नव्हे, तर त्यांना जोडणारा दुवा ठरला पाहिजे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी केले. हिंदी महासागर क्षेत्रातील देशांचे सागरी आणि सांस्कृतिक संबंध ऐतिहासिक असल्याचे सांगत त्यांनी या प्रदेशातील देशांनी परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. मालदीवची राजधानी माले येथे आयोजित कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हच्या (CSC) आठव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

अजित डोवाल म्हणाले की, हिंदी महासागराच्या किनारी असलेले देश एकाच सागरी क्षेत्राचे भागीदार आहेत. त्यांच्यात दीर्घ इतिहासातून निर्माण झालेले सांस्कृतिक संबंध आहेत. पूर्वीच्या पिढ्यांनी समुद्राच्या माध्यमातून देश आणि समुदायांना जोडण्याची परंपरा निर्माण केली. ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सध्याच्या देशांवर आहे. त्यामुळे हिंदी महासागराने देशांना एकत्र आणले पाहिजे, त्यांच्यात फूट पाडता कामा नये.

कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची स्थापना नोव्हेंबर २०२० मध्ये हिंदी महासागर क्षेत्रातील सुरक्षा, स्थैर्य आणि सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. या संघटनेने आतापर्यंत चांगली प्रगती केली असली, तरी पुढील काळात आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे, असे डोवाल यांनी नमूद केले.

भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाचा आणि ‘महासागर’ (MAHASAGAR) दृष्टिकोनाचा कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हशी जवळचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून भारत सदस्य देशांसोबत काम करून बदलत्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक क्षमता वाढवण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी भारत आवश्यक ती मदत आणि सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दीपथूनवर दिवा न लावल्याने वाद

पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त

अमेठीत ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्या १० जणांच्या टोळक्याला अटक

होर्मुझच्या सामुद्रधुनीत चार तेलवाहू जहाजांना आग

पाच प्रमुख क्षेत्रांवर सहकार्य

कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हमध्ये भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस, बांगलादेश आणि सेशेल्स या सहा देशांचा समावेश आहे. सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि कट्टरतावादाला आळा घालणे, अमली पदार्थ व मानवी तस्करीसह संघटित गुन्हेगारी रोखणे, सायबर सुरक्षा आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत व बचावकार्य ही या संघटनेच्या सहकार्याची पाच प्रमुख क्षेत्रे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version