घरविशेषमुंबईकरांनो बादल्या भरून ठेवा!

मुंबईकरांनो बादल्या भरून ठेवा!

मुंबईत १८ तास पाणीपुरवठा बंद!

- Advertisement -

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शिवडी परिसरातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे २२ एप्रिल (बुधवार) सकाळी १० ते २३ एप्रिल (गुरुवार) पहाटे ४ या कालावधीत तब्बल १८ तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. या कामाचा परिणाम दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक भागांवर होणार असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

का बंद राहणार पाणी?

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शिवडीतील हाजी बंदर मार्गावर १५०० मिमी व्यासाचे दोन ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मोठा जलविभाजक बंद ठेवावा लागणार असल्याने पाणीपुरवठा थांबवण्यात येणार आहे.

कोणत्या विभागात कधी पाणी बंद?

‘ए’ विभाग (बुधवार – पूर्णपणे बंद)

CSMT परिसर, पी. डिमेलो मार्ग, सेंट जॉर्ज रुग्णालय, RBI, नौदल डॉकयार्ड आदी भागात दिवसभर पाणीपुरवठा बंद.

‘बी’ विभाग

  • बुधवार: उमरखाडी, वाडी बंदर, दाणा बंदर, बीपीटी परिसर
  • गुरुवार पहाटे: मोहम्मद अली रोड, मशीद बंदर, नखोडा मोहल्ला परिसर

‘सी’ विभाग (गुरुवार पहाटे बंद)

बोरा बाजार, एसबीयूटी क्षेत्र, पाकमोडिया मार्ग, बापू कोटे मार्ग आदी गजबजलेल्या भागात पाणीपुरवठा बंद.

‘ई’ विभाग

  • बुधवार: माझगाव, नागपाडा, मदनपुरा, आग्रीपाडा, चिंचपोकळी, कामाठीपुरा यांसह अनेक भागांत पूर्ण बंद
  • गुरुवार: भायखळा, नागपाडा येथे कमी दाबाने पाणीपुरवठा

जेजे, नायर, कस्तुरबा रुग्णालयांवरही परिणाम

‘एफ-दक्षिण’ विभाग

  • गुरुवार: शिवडी, वडाळा (पूर्व), परळ गाव येथे पाणी बंद
  • कमी दाबाने: दादर, लालबाग, हिंदमाता परिसर

केईएम, टाटा, वाडिया रुग्णालयांनाही फटका

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • आधीच पाण्याचा साठा करून ठेवा
  • पाणी जपून वापरा
  • पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर ४-५ दिवस पाणी उकळून व गाळून प्या

पालिकेचे आवाहन

महानगरपालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, ऐन उन्हाळ्यातील ही कपात लक्षात घेता सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे.

मुंबईत २२-२३ एप्रिल दरम्यान मोठी पाणी कपात होणार आहे. त्यामुळे “बादल्या भरून ठेवा!”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version