घरविशेषदहशतवादी गोल्डी ब्रारवर १० लाख रुपयांचे बक्षीस!

दहशतवादी गोल्डी ब्रारवर १० लाख रुपयांचे बक्षीस!

गोल्डीसह आणखी एकाचा फोटो शेअर करत एनआयएचे जनतेला आवाहन

चंदीगडमधील एका व्यावसायिकाच्या घरावर खंडणी आणि गोळीबार केल्याप्रकरणी दहशतवादी गोल्डी ब्रारची माहिती देणाऱ्यास एनआयएकडून १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. एनआयएने दहशतवादी गोल्डी ब्रारसह आणखी एका गुंडाचा फोटो शेअर करत माहितीची देण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले आहे. हे दोघेही वॉन्टेड असून माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे एनआयए पथकाने सांगितले आहे.

माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही एजन्सीने सांगितले आहे. ८ मार्च २०२४ रोजी खंडणीच्या नावाखाली चंदीगडमधील एका व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी गँगस्टर गोल्डी ब्रार आणि गुरप्रीत सिंग उर्फ ​​गोल्डी ढिल्लॉन उर्फ ​​गोल्डी राजपुरा या गुंडांचे नाव समोर आले होते. एनआयएचे पथक या दोघांचा शोध घेत असून आता दोघांच्या अटकेसाठी बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस एजन्सीने जाहीर केल आहे. या दोघांविरुद्ध पंजाबमध्ये विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

प्रज्वल रेवण्णाला कोर्टाकडून आणखी एक झटका, जामीन अर्ज फेटाळला!

काँग्रेसने स्वहस्ते केले तोंड काळे…

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून; ‘हे’ मुद्दे गाजण्याची शक्यता

‘ओवेसीची जीभ छाटा अन पारितोषिक घेवून जा’

दरम्यान, कॅनडामध्ये राहून भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गँगस्टर गोल्डी ब्रारवर केंद्र सरकारने नुकतीच मोठी कारवाई केली होती. त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. दहशतवादी गोल्डी हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात असल्याचे बोलले जाते.पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आरोपी गोल्डी ब्रार असल्याचे मानले जाते. आरोपी गोल्डी ब्रारच्या सांगण्यावरून बिष्णोई टोळीच्या कार्यकर्त्यांनी गायक मुसेवालाची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version