घरविशेषनिकेत कौशिक यांनी घेतले कारूळकरांच्या विघ्नहर्त्याचे दर्शन

निकेत कौशिक यांनी घेतले कारूळकरांच्या विघ्नहर्त्याचे दर्शन

मीरा-भाईंदर-वसई-विरार परिक्षेत्राचे पोलीस आयुक्त

उद्योगपती तथा कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांच्या बोरीवली येथील कार्यालयात दीड दिवसांचा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. मनोभावे केलेली बाप्पाची सेवा, भक्तिभावाने होणारी पूजा आणि श्रीगणरायाच्या दर्शनासाठी झालेली भक्तांची गर्दी, अशा मंगलमय वातावरणात गणेशोत्सवाला रंगत आली.

गणेशोत्सवानिमित्त मीरा-भाईंदर-वसई-विरार परिक्षेत्राचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी प्रशांत कारुळकर यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्रीगणरायाचे मनोभावे दर्शन घेत पूजा केली आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

हे ही वाचा:

तिरुपती लाडू प्रकरणी ‘सुकृती फूड्स’च्या प्रवर्तकाला अटक

रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ

मराठमोळ्या ‘गोंधळ’ची यंदा ऑस्करवारी

दीड फुटांचा बाप्पा… भक्ती मात्र आभाळाएवढी!

१९९५च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असलेले निकेत कौशिक यांनी यावेळी प्रशांत कारुळकर तसेच त्यांच्या पत्नी आणि कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा शीतल जोशी कारुळकर यांची भेट घेतली. यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version