घरविशेषक्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक संधी!

क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक संधी!

'पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026'चे भव्य आयोजन करण्यासंदर्भात सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथे पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्यामध्ये ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’चे भव्य आयोजन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’च्या माध्यमातून वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याला प्रमुख पर्यटन आणि जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करणे शक्य होणार आहे. ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धा येत्या तीन चार वर्षांत निश्चितच जागतिक स्तरावर लोकप्रिय स्पर्धा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

हे ही वाचा : 

आशिया कपसाठी पाकिस्तान हॉकी संघाला भारतात येण्याची परवानगी!

मराठी बोलावीच लागेल पण मारहाण चुकीची!

महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत योजनेची रुग्णालय संख्या कधी वाढवणार?

लखनौमध्ये १५ जणांनी इस्लाम सोडून स्वीकारला ‘हिंदू धर्म’

जगभरातील २०० देशात सायकलिंग या क्रीडा प्रकाराचे चाहते आहेत, त्यांच्यापर्यंत या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याची संस्कृती, परंपरा या सर्व गोष्टी पोहचण्यास मदत होणार आहे. तसेच या स्पर्धेतून पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होण्याची संधी निर्माण होणार आहे. एक आरोग्यदायी जीवनशैली स्विकारण्यास प्रोत्साहन देणारी अशी ही स्पर्धा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी सीएफआयचे अध्यक्ष पंकज सिंह व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version