घरविशेषपंजाब पोलिसांनी दोन हेरांना केली अटक

पंजाब पोलिसांनी दोन हेरांना केली अटक

पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवल्याचा आरोप

- Advertisement -

भारतीय लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या आरोपावरून अमृतसर पोलिसांनी दोन हेरांना अटक केली आहे. या दोघांनी लष्कराच्या छावण्यांचे आणि हवाई दलाच्या तळांचे फोटो पाकिस्तानला पाठवले असल्याचा आरोप आहे. पंजाब पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. पंजाब डीजीपी यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर पोस्टद्वारे सांगण्यात आले की, “एका महत्त्वाच्या अँटी-स्पायिंग मोहिमेअंतर्गत, अमृतसर ग्रामीण पोलिसांनी ३ मे रोजी पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोघांना अटक केली. हे दोघे अमृतसरमधील लष्करी छावणी क्षेत्रांतील आणि हवाई दलाच्या तळांतील संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे पाकिस्तानला पाठवत होते.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, या दोघांचे संबंध पाकिस्तानातील गुप्तहेरांशी होते, जे हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू उर्फ हॅप्पी यांच्या माध्यमातून तयार झाले होते. हरप्रीत सिंग सध्या अमृतसर सेंट्रल जेलमध्ये कैद आहे. या प्रकरणी अधिकृत गोपनीयता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. तपासाच्या पुढच्या टप्प्यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा..

योगगुरू शिवानंद बाबा यांचे निधन

सीआरपीएफ मुख्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर पाकिस्तानी महिलेशी लग्न केले!

उद्धव ठाकरेंच्या सुट्टीवर मिलिंद देवरांची टिपण्णी

“सिंधूचे पाणी अडवल्यास हल्ला करू” पाकच्या संरक्षण मंत्र्यांकडून पोकळ धमकी

डीजीपी यांनी सांगितले की, “पंजाब पोलीस भारतीय लष्करासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे. पंजाब पोलीस राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्याच्या कर्तव्यात अढळ आहेत. आमच्या सशस्त्र दलांच्या सुरक्षेला कोणतीही बाधा आणण्याचा प्रयत्न झाला तर त्याला ठोस आणि तात्काळ प्रत्युत्तर दिले जाईल. राष्ट्र सर्वोच्च. या दोन्ही हेरांकडून अमृतसर पोलीस चौकशी करतील. या चौकशीतून अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून अमृतसर सेंट्रल जेलमध्ये असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू याच्याकडूनही चौकशी केली जाणार आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की, तपास सुरू असून हे दोघे पिट्टूच्या संपर्कात कसे आले आणि पाकिस्तानला फोटो पाठवण्याव्यतिरिक्त आणखी काय करत होते, याची चौकशी केली जाईल. तसेच, पोलिसांकडून या दोन्ही हेरांच्या कुटुंबीयांशी आणि आजूबाजूच्या लोकांशीही चौकशी करून या प्रकरणाची सखोल तपासणी केली जाईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version