घरविशेषमला अभिमान आहे, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन!

मला अभिमान आहे, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन!

पाक ड्रोन हल्ल्यात हुतात्मा जवानाच्या मुलीची प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या सीमेचे रक्षण करताना हुतात्मा झालेले राजस्थानचे झुनझुनू जिल्ह्याचे शूर सुपुत्र सुरेंद्र कुमार यांचे पार्थिव आज (११ मे ) सकाळी लष्करी सन्मानासह झुनझुनू येथे पोहोचले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रामावतार मीणा आणि पोलिस अधीक्षक शरद चौधरी हे देखील उपस्थित होते. यानंतर, त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मेहरादसी (तहसील मांडवा) येथे नेण्यात आले, जिथे त्यांना पूर्ण राजकीय सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला.

हुतात्मा सार्जंट सुरेंद्र मोगा यांची मुलगी वर्तिका म्हणाली, “मला अभिमान आहे की माझे वडील देशाचे रक्षण करताना आणि शत्रूंना मारताना हुतात्मा झाले. आम्ही काल रात्री ९ वाजता त्यांच्याशी शेवटचे बोललो. त्यांनी सांगितले की ड्रोन उडत आहेत पण हल्ले करत नाहीत. पाकिस्तान पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे. मलाही माझ्या वडिलांसारखे सैनिक बनायचे आहे आणि त्यांच्या हौतात्म्याचा बदला घ्यायचा आहे. मी त्यांना एक एक करून मारेन.”

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींनी ठणकावले; आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच!

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा! 

जम्मू-कश्मीरमध्ये शस्त्रसंधीनंतर लोकांना दिलासा

आयपीएलची रंगत पुन्हा पेटणार!

झुंझुनू जिल्ह्यातील मांडवा येथे पूर्ण राजकीय सन्मानाने हुतात्मा सुरेंद्र कुमार यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे प्रभारी कॅबिनेट मंत्री अविनाश गेहलोत, उपमुख्यमंत्री डॉ.प्रेमचंद बैरवा, सैनिक कल्याण मंत्री राज्यवर्धन राठोडसह अन्य नेते उपस्थित होते.

हुतात्मा सुरेंद्र कुमार हे १५ एप्रिल रोजी त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर कर्तव्यावर परतले होते. त्यांच्या मागे ८ वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा मुलगा आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की त्यांनी गावात नुकतेच एक नवीन घर बांधले आहे आणि काही दिवसांपूर्वीच गृह प्रवेश झाला होता. जवान सुरेंद्र कुमार यांच्या जाण्याने परिसरात शोकाकुळ वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version