घरविशेषशेख हसीनांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, बांगलादेशने रेड कॉर्नर नोटीसची केली विनंती!

शेख हसीनांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, बांगलादेशने रेड कॉर्नर नोटीसची केली विनंती!

बांगलादेशने जारी केलेल्या यादीत १२ जणांचा समावेश 

बांगलादेश सरकार आता माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेश पोलिसांनी इंटरपोलला १२ जणांविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे. बांगलादेश पोलिसांच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने जारी केलेल्या या यादीत माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे नाव देखील समाविष्ट आहे. बांगलादेश पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला आहे आणि सांगितले आहे की ते हसीना शेख यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करतील.

या सर्वांवर बांगलादेशात अस्थिरता पसरवण्याचा कट रचण्याचा आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. पोलिस मुख्यालयातील सहाय्यक महानिरीक्षक (मीडिया) एनामुल हक सागर यांच्या हवाल्याने ढाका ट्रिब्यूनने याची पुष्टी केली. हक म्हणाले की, बांगलादेश पोलिसांच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने (एनसीबी) इंटरपोलला रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे. ते पुढे म्हणाले, ‘चालू प्रकरणाच्या तपासादरम्यान किंवा कार्यवाहीदरम्यान समोर आलेल्या आरोपांच्या संदर्भात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.’

हे ही वाचा : 

आयपीएल सामन्यादरम्यान न्यायाधीशांचा अ‍ॅपल आयफोन खिशातून गायब

मामाने चोर म्हटले म्हणून तो तलवार घेऊन रस्त्यावर उतरला आणि…

डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदींशी संवाद साधल्यानंतर एलोन मस्क येणार भारत दौऱ्यावर!

इनामुल हक सागर पुढे म्हणाले, न्यायालये, सरकारी अभियोक्ते आणि तपास संस्थांकडून मिळालेल्या अपिलांच्या आधारे ही विनंती करण्यात आली आहे. ते म्हणाले की, तपास प्रक्रियेदरम्यान किंवा एखाद्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उद्भवणाऱ्या आरोपांच्या आधारे इंटरपोलची मदत घेतली जाते. जर एखादा आरोपी परदेशात असेल आणि त्याचा ठावठिकाणा माहित असेल तर ती माहिती इंटरपोलला पाठवली जाते जेणेकरून आरोपीला संबंधित देशात पकडता येईल. सागर यांनी असेही स्पष्ट केले की रेड नोटीसची विनंती अद्याप प्रक्रियेत आहे आणि इंटरपोलच्या मंजुरीची वाट पाहत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version