घरविशेषरायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, तिघांचा मृत्यू!

रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, तिघांचा मृत्यू!

अपघातात रिक्षाचा चक्काचूर

- Advertisement -

रायगडमध्ये रिक्षा आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई -गोवा महामार्गावर माणगावमध्ये हा अपघात झाला. ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला आली असता ही दुर्घटना घडली.अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे.तसेच शिवशाही बसचे देखील नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील माणगाव नजीक शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला.सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.माणगाव येथील मानस हॉटेल समोर शिवशाही बस आणि रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती आहे.या अपघातामध्ये रिक्षात असलेल्या तिघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा..

मोदीच्या गॅरंटीमुळे इंडी आघाडी चिंतेत!

पंजाबमध्ये ५५ वर्षीय महिलेची नग्न धिंड; तिघांना अटक, दोघांचा शोध सुरू

कंगना रनौटमुळे सुरू झाली चर्चा; बरकतुल्लाह, सुभाषचंद्र बोस की नेहरू?

कॉंग्रेसची नारी न्याय योजना दिशाभूल करणारी

या अपघातात दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. बसचे देखील मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version