घरबिजनेससोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

मजबूत डॉलर आणि तेलाच्या वाढत्या किमतींचा दबा

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील बॉन्ड यील्डमध्ये झालेली मोठी वाढ, मजबूत झालेला डॉलर आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे सोन्या-चांदीवर विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या १० वर्षांच्या रिअल ट्रेझरी यील्डने सुमारे २.८५ टक्क्यांवर पोहोचत मागील १८ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे व्याज किंवा नियमित परतावा न देणाऱ्या सोन्यापेक्षा बॉन्डसारख्या मालमत्तांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर दिसून आला आहे.

देशांतर्गत बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर डिसेंबर वायदा सोन्याचा भाव सुमारे १ लाख ४८ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आला, तर चांदीचा भाव सुमारे २ लाख २५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला. मागील व्यवहार सत्रात सोन्याच्या दरात सुमारे ३ टक्के, तर चांदीच्या दरात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव सुमारे ४ हजार १६८ डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव सुमारे ६१ डॉलर प्रति औंसपर्यंत घसरला. त्यामुळे काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या मौल्यवान धातूंमध्ये आता मोठ्या प्रमाणात नफावसुली होत असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
१ ऑक्टोबरपासून एसबीआयच्या या खातेदारांसाठी नवा नियम

दहशतवाद या भारताच्या चिंतेची दखल न घेतल्यास संबंधांवर परिणाम

शॉटगनमध्ये नीरू धांडाने दिले भारताला पाचवे सुवर्णपदक

संभल हिंसाचारातील आरोपीची राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गातील अटक रद्द

सोन्या-चांदीच्या घसरणीमागे अमेरिकेतील व्याजदर आणि महागाईशी संबंधित अपेक्षाही महत्त्वाची ठरत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाईचा दबाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत कठोर भूमिका घेतली जाऊ शकते, अशी बाजारातील अपेक्षा आहे. त्याचवेळी अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे डॉलरमध्ये किंमत ठरणाऱ्या सोन्या-चांदीवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. चीनमधील सुट्ट्यांपूर्वी झालेली नफावसुली आणि जागतिक बाजारातील अस्थिरताही या घसरणीला कारणीभूत ठरली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version