भारतात झालेल्या १८व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला इन्स्टाग्रामवर शस्त्रांसह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. दीपक बांगर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो दिल्ली पोलिसांच्या परदेशी नागरिक विभागात (Foreigners Cell) कार्यरत होता. ब्रिक्स परिषदेसाठी मध्य दिल्लीतील परदेशी प्रतिनिधी वास्तव्यास असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची स्नायपर म्हणून तैनाती करण्यात आली होती.
दीपक बांगर यांची हॉटेलच्या टेरेसवर स्नायपर ड्युटी लावण्यात आली होती. याच काळात त्यांनी इन्स्टाग्रामवर दोन व्हिडिओ पोस्ट केले. हे व्हिडिओ पोलिस विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. एका व्हिडिओमध्ये बांगर नागरी कपड्यांमध्ये दिसत असून, त्यांच्या गळ्यात ब्रिक्स शिखर परिषद २०२६चे ओळखपत्र असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये ते सर्व्हिस पिस्तूल हाताळताना दिसत आहेत. तसेच हॉटेलच्या आजूबाजूचा परिसरही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये बांगर हॉटेलच्या टेरेसवरून स्नायपर रायफलच्या दुर्बिणीतून परिसराकडे पाहताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीत जवळील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी संबंधित संरचनाही दिसत आहेत.
हे दोन्ही व्हिडिओ बांगर यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून पोस्ट करण्यात आले होते. त्यांचे इन्स्टाग्राम खाते आता बंद करण्यात आले आहे. संवेदनशील सुरक्षा ड्युटीवर तैनात असताना अशा प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते समाजमाध्यमांवर सार्वजनिक केल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले. यानंतर दिल्ली पोलिसांनी बांगर यांना ब्रिक्सच्या सुरक्षा ड्युटीतून तातडीने हटवले आणि निलंबित केले. तसेच त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठवण्यात आले आहे.
Indian police SNIPER SUSPENDED after ‘BRICS SECURITY BREACH’ – The Print
OFFICER DEEPAK BANGAR POSTED INSTAGRAM FOOTAGE of himself ARMED atop HOTEL hosting FOREIGN DELEGATES
Instagram ACCOUNT BLOCKED, SNIPER STRIPPED OF BRICS DUTY and SENT HOME pic.twitter.com/gl8cWrvQIx
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 16, 2026
हे ही वाचा:
मक्काजवळ ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नावर भारताची चिंता
काँग्रेस आमदाराची भाची सरकारी नोकरीसोबत करत होती ‘एमडी’
भारतीय युद्धनौकेला पाकिस्तानी जहाज धडकल्यावर केली कानउघाडणी
भारत-न्यूझीलंड व्यापाराचा नवा अध्याय; मुक्त व्यापार कराराला हिरवा कंदील
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून बांगर यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हे व्हिडिओ नेमके कोणत्या परिस्थितीत रेकॉर्ड करण्यात आले आणि ते इन्स्टाग्रामवर कशा प्रकारे अपलोड करण्यात आले, याचा तपास या चौकशीत केला जाणार आहे.
