घरक्राईमनामाखरातच्या व्हिडीओची विक्री, महाराष्ट्र सायबर सेल कडून गुन्हा

खरातच्या व्हिडीओची विक्री, महाराष्ट्र सायबर सेल कडून गुन्हा

व्हीडिओ लिंक शेअर करण्यासाठी मागितले पैसे

अश्लील व्हिडिओ व्हायरल करून त्यांची विक्री केल्याच्या धक्कादायक प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने मोठी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अशोक खरात याच्याशी संबंधित असल्याचा दावा असलेल्या व्हिडिओंचा सोशल मीडियावर प्रसार केल्याप्रकरणी चार वेगवेगळ्या लिंकविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्याशी संबंधित सुमारे १५ ते १७ अश्लील व्हिडिओ विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पॉर्न वेबसाईट्ससह फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले होते.

हे ही वाचा:

“आज रात्री एक संस्कृती संपेल”; इराणला ट्रम्प यांचा इशारा

कुटूंबातील सदस्याच्या मृत्यूची भीती दाखवून खरात फसवत असे!

विल्सनच्या १९७६च्या बॅचची झाली रियुनियन, शाळेतल्या आठवणींनी चेहरे फुलले

मेट्रोची ‘नऊ’लाई; दहिसर-काशीगाव मार्गामुळे प्रवास आरामात

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या व्हिडिओंची मागणी करणाऱ्यांकडून प्रत्येकी २० ते ५० रुपये आकारले जात होते. पैसे मिळाल्यानंतर संबंधितांना हे व्हिडिओ पाठवले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकारामुळे व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या पीडितांची ओळख उघड होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून त्यांच्या गोपनीयतेवर गदा आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे.

महाराष्ट्र सायबरचे प्रमुख यशस्वी यादव यांनी या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली असून सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले. तपासाच्या पुढील टप्प्यात काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version