घरविशेषजिम बंद झाल्याच्या रागातून सोमय्यांचा नामफलक पेटवला

जिम बंद झाल्याच्या रागातून सोमय्यांचा नामफलक पेटवला

मुलुंडमधील तरुण जेरबंद

- Advertisement -

सोसायटीतील अनधिकृत जिम बंद झाल्याचा राग अनावर झाल्याने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा नामफलक पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. मुलुंड पूर्व येथील नीलम नगर भागात सोमवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण कुंदर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो नीलम नगरमधील ज्या सोसायटीत सोमय्या राहतात, त्याच सोसायटीच्या दुसऱ्या विंगमध्ये राहतो. प्रवीणचे आई-वडील परदेशात असतात आणि काही महिन्यांपूर्वीच त्याची नोकरी सुटली होती. तो नियमितपणे सोसायटीतील जिममध्ये व्यायामासाठी जात असे. मात्र, ही जिम बेकायदेशीर असल्याच्या तक्रारीनंतर ती बंद करून नानेपाडा येथे हलवण्यात आली होती.

जिम लांब गेल्यामुळे व्यायाम करण्यासाठी त्रास होत होता. याला सोमय्याच जबाबदार असल्याचा समज प्रवीणने करून घेतला होता. तसेच सोमय्यांनी लावलेले नामफलकही बेकायदेशीर असल्याचा त्याचा दावा होता. याच रागातून त्याने सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास हे कृत्य केले.

हे ही वाचा:

खरातच्या व्हिडीओची विक्री, महाराष्ट्र सायबर सेल कडून गुन्हा

“आज रात्री एक संस्कृती संपेल”; इराणला ट्रम्प यांचा इशारा

पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीसाठी अभूतपूर्व सुरक्षा

पश्चिम आशियातील तणावातही भारताची अर्थव्यवस्था मजबूत
पहाटेच्या वेळी काळे कपडे आणि डोक्यावर हेल्मेट घालून आलेल्या प्रवीणने सोमय्यांच्या कार्यालयापासून ४० फूट अंतरावर असलेल्या लोखंडी नामफलकावर पेट्रोल टाकून आग लावली. तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेत नामफलकाचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले.तांत्रिक तपासाअंती प्रवीण कुंदरला अटक करण्यात आली.त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (फ)** अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

“आरोपीने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला तातडीने अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.”
-पराग सोनवणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version