घरक्राईमनामाहरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या

हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या

हल्लेखोरांचा शोध सुरू

हरियाणवी गायक आणि युट्यूबर अंकित बालियान याची उत्तर प्रदेशातील शामलीमध्ये जिमबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. जिममधून बाहेर पडत असताना तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी अंकितवर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी अनेक पथकं तैनात करण्यात आली आहेत. हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, आगामी पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वैमनस्याच्या शक्यतेचाही तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अंकित बालियान हा शामली जिल्ह्यातील बंटीखेडा गावचा रहिवासी होता. हरियाणवी संगीत क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान’, ‘गोली के बारूद’, ‘जाट जाटनी’, ‘सिस्टम’ आणि ‘रायफलें’ यांसारख्या गाण्यांमुळे तो लोकप्रिय झाला होता. संगीतासोबतच तो युट्यूबवर पॉडकास्ट आणि स्थानिक विषयांवरील व्हिडीओही करत होता.

हे ही वाचा:

नेपाळच्या महापुरामागे भूकंप नव्हे, हिमनदी कोसळल्याचा धक्का!

‘टॉक्सिक’ने पहिल्याच दिवशी कमावले १०१ कोटी!

चिखल, पाण्याच्या महाकाय तडाख्याने तिबेट, नेपाळमध्ये हाहा:कार, ९५ मृत्युमुखी, १३३ भारतीय बेपत्ता

भारत-फ्रान्स मिळून बनवणार ‘अरावली’ हेलिकॉप्टर इंजिन

अंकितच्या हत्येनंतर कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांनी दिल्ली-मुझफ्फरनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आरोपी अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिकाही कुटुंबीयांनी घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या हत्येमुळे हरियाणवी संगीत क्षेत्रासह अंकितच्या चाहत्यांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version