घरक्राईमनामाउत्तर प्रदेशातील किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयात लव्ह जिहाद, धर्मांतरण, शोषण

उत्तर प्रदेशातील किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयात लव्ह जिहाद, धर्मांतरण, शोषण

यूपी सरकारकडून एसटीएफ अहवालाच्या आधारे चौकशी

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लखनौ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (KGMU) प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. निवासी डॉक्टर रमीजुद्दीन मलिक आणि मोहम्मद आदिल यांच्यासह विद्यापीठातील काही कर्मचारी आणि डॉक्टरांवर हिंदू विद्यार्थिनींचे कथित धर्मांतर, लव्ह जिहाद, मानसिक छळ आणि लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी उत्तर प्रदेश विशेष कृती दलाने (STF) सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठाला कारवाईचा अहवाल सरकारकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी तयार करण्यात आलेल्या एसटीएफच्या अहवालात विद्यापीठाच्या पॅथॉलॉजी, गांधी वॉर्ड, मायक्रोबायोलॉजी आणि रेडिओलॉजी विभागांमधील अनेक तक्रारींचा उल्लेख आहे.

निवासी डॉक्टर रमीजुद्दीन मलिक आणि मोहम्मद आदिल यांच्याविरोधात महिला डॉक्टर व परिचारिकांनी तक्रारी दाखल केल्याचे अहवालात म्हटले आहे. डॉक्टर देवर्ती मित्रा यांनी रमीजुद्दीनवर प्रेमसंबंधाच्या माध्यमातून मानसिक व शारीरिक शोषण केल्याचा, तसेच इस्लाम धर्म स्वीकारून निकाह करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात रमीजुद्दीनला जानेवारी २०२६ मध्ये अटक झाली होती. विद्यापीठाच्या अंतर्गत विशाखा समितीनेही त्याला दोषी ठरवल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

विभागप्रमुख सुरेश बाबू आणि अतिरिक्त प्राध्यापक सुमैया कय्यूम यांनी आरोपींना संरक्षण दिले, तर तक्रारदार डॉक्टरांची बदनामी करून तक्रारी दडपण्याचा प्रयत्न केला, असेही एसटीएफने नमूद केले आहे. काही शिक्षकांकडून हिंदू विद्यार्थ्यांशी भेदभाव आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना विशेष सवलती दिल्याचे आरोपही अहवालात आहेत.

हे ही वाचा:

हा विरोधी पक्ष नव्हे, तर अडथळा पक्ष!

आली रे आली हिशेबाची वेळ आली!

लाडावलेल्या राजपुत्राला खुश करण्यासाठी प्रतिकात्मक संसद

भारताच्या नाविकला बळ देणारा एनव्हीएस-०३

गांधी वॉर्डमध्ये नफीस आणि फरकान या कर्मचाऱ्यांवर महिला परिचारिकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचे आणि धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे आरोप आहेत. मायक्रोबायोलॉजी विभागात ज्योती राव या महिला कर्मचाऱ्याचा छळ करून धर्मांतर व निकाहासाठी दबाव आणल्याचा आरोप शफाअत अली खान यांच्यावर आहे. रेडिओलॉजी विभागातही दोन महिला निवासी डॉक्टरांना धर्मांतरासाठी दबाव आणि परीक्षेत नापास करण्याच्या धमक्या दिल्याचे अहवालात नमूद आहे.

एसटीएफच्या अहवालात आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेज आणि लखनौच्या KGMU मधील काही मुस्लिम विद्यार्थी व डॉक्टरांच्या कथित संघटित गटाचा उल्लेख करण्यात आला आहे. हा गट हिंदू महिला डॉक्टरांशी जवळीक निर्माण करून त्यांच्यावर धार्मिक विचारांचा प्रभाव टाकत असल्याचा आरोप आहे. काही शिक्षकांकडून या गटाला मदत मिळत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

धर्मांतराच्या तक्रारींची चौकशी करणाऱ्या समित्यांवर विशिष्ट व्यक्तींचा प्रभाव असल्याचा आणि तक्रारींवर योग्य कारवाई होत नसल्याचा दावा एसटीएफने केला आहे. विद्यापीठातील काही वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात आली आहे.

महिला डॉक्टरांच्या धर्मांतरणासाठी १५ लाख 

अहवालात रमीजुद्दीन मलिकचा कथित धर्मांतराच्या मोठ्या नेटवर्कशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरांचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी १५ लाख रुपये, तर इतर व्यक्तींच्या धर्मांतरासाठी ५ लाख रुपये बक्षीस दिले जात असल्याचा दावा तपासात समोर आल्याचे वृत्तात म्हटले आहे. त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सुमारे ५० महिलांची छायाचित्रे आढळल्याचाही उल्लेख आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version